रामटेक रेल्वे स्थानक
रामटेक हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेल्या कन्हान रेल्वे स्थानकानंतर एक फाटा रामटेकला जातो. हे नागपूर स्थानकापासून सुमारे ४१.७ किमी अंतरावर आहे. येथे २ फलाट आहेत.येथे फक्त नागपूर व इतवारी स्थानकासाठी गाड्या सुटतात व फक्त इतवारी व नागपूर स्थानकावरून येथे गाड्या येतात. हे एक टर्मिनस आहे.[१] रामटेक येथे रामाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर गडावर असल्याने यास 'गडमंदिर' असे म्हणतात.
रामटेक दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | राज्य मार्ग क्र. २४९, रामटेक, नागपूर |
गुणक | 21°23′37.1″N 79°18′00.3″E / 21.393639°N 79.300083°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ३२७ मी |
मार्ग | हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग |
जोडमार्ग | कन्हान |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | RTK |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे |
स्थान | |
|
रामटेकला जाणाऱ्या गाड्या व तेथून सुटणाऱ्या गाड्या
संपादनया गाड्या दररोज आहेत.