कन्हान जंक्शन रेल्वे स्थानक
(कन्हान रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
कन्हान हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गाावर कामठी रेल्वे स्थानकानंतर ४ किमी अंतरावर आहे. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १८.५ किमी अंतरावर हावड्याकडे आहे. येथे ३ फलाट आहेत.येथे सुमारे १८ गाड्या थांबतात.येथून रामटेकला एक फाटा जातो.[१] येथे जलद व अतिजलद रेल्वेगाड्यांना थांबा नाही.येथे थांबणाऱ्या बहुतेक गाड्या या प्रवासी (पॅसेंजर) गाड्या आहेत.[१][२]
कन्हान दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | जबलपूर- नागपूर रस्ता,राष्ट्रीय महामार्ग ७, कन्हान, जिल्हा- नागपूर |
गुणक | 21°13′29.6″N 79°14′13.4″E / 21.224889°N 79.237056°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २८६ मी |
मार्ग | हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | KNHN |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे |
स्थान | |
|
कन्हान येथून जाणाऱ्या गाड्या
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b c ईरेल.इन हे संकेतस्थळ "Kanhan Nagpur" Check
|दुवा=
value (सहाय्य). १० जानेवारी २०१९ रोजी पाहिले. - ^ "कन्हान रेल्वे स्थानकावरून गाड्या".