सुधीर फडके

महाराष्ट्रातील संगीतकार व गायक
(रामचंद्र विनायक फडके या पानावरून पुनर्निर्देशित)


रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. बाबूजी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते.[] त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीतआहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली.

सुधीर फडके
सुधीर फडके
जन्म नाव रामचंद्र विनायक फडके
टोपणनाव बाबूजी
जन्म जुलै २५, १९१९
कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यू जुलै २९, २००२
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत, गायन, चित्रपटनिर्मिती
संगीत प्रकार चित्रपटसंगीत, स्वतंत्र रचना
प्रसिद्ध रचना गीतरामायण
वडील विनायक फडके
पत्नी गायिका ललिता देऊळकर- फडके
अपत्ये श्रीधर फडके
पुरस्कार राष्ट्रपती पदक
सह्याद्री स्वररत्न पुरस्कार

फडके यांनी अनेक अजरामर गीते तयार केली आहेत. त्यांची अनेक भक्तीगीते, सुगम संगीत आणि चित्रपट गीते प्रचंड लोकप्रिय आहेत.

कवी ग.दि. माडगूळकर यांचे अजरामर गीतरामायण ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की, या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते. फडके यांनी यातील सर्व ५६ गाणी संगीतबद्ध केली.

बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या 'प्रभात चित्र संस्थे'संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.

त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.

आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य (परचुरे प्रकाशन - २००४)

कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्टूगिस वासाहती मुक्त करण्यासाठी ,'आझाद गोमन्तक'दलाचे सदस्य होते .2 आगस्ट 1954 रोजी दलाच्या तरुणांना नी सशस्त्र हला करून दादरा वा नगर हवेली पोरतुगिस सत्तेपासून हा प्रदेश मुक्त केला.गोवा मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते मोहन रानडे १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली रानडे यांच्या सुटकेसाठी सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती.

कारकीर्द

संपादन

संगीतकार

संपादन

बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीत दिले. त्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे  :

  • गोकुळ (१९४६)
  • आगे बढो (१९४७)
  • सीता स्वयंवर (१९४८)
  • अपराधी (१९४९)
  • जय भीम (१९४९)
  • माया बाजार (१९४९)
  • राम प्रतीज्ञा (१९४९)
  • संत जनाबाई (१९४९)
  • श्री कृष्ण दर्शन (१९५०)
  • मालती माधव (१९५१)
  • मुरलीवाला (१९५१)
  • पहली तारीख (१९५४)
  • रत्न घर (१९५४)
  • शेवग्याच्या शेंगा (१९५५)
  • देवघर (१९५६)
  • सजनी (१९५६)
  • गज गौरी (१९५८)
  • गोकुल का चोर (१९५९)
  • भाभी की चूडियां (१९६१)
  • प्यार की जीत (१९६२)
  • एकटी (१९६८)
  • आधार (१९६९)
  • दरार (१९७१)
  • शेर शिवाजी (१९८१)
  • रुक्मिणी स्वयंवर
  • आम्ही जातो आमुच्या गावा
  • पुढचे पाऊल
  • जगाच्या पाठीवर
  • सुवासिनी
  • प्रपंच
  • मुंबईचा जावई

एक गायक म्हणून बाबूजींनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत :

  • अंतरीच्या गूढ गर्भी (भावगीत)
  • अशी पाखरे येती (भावगीत)
  • आकाशी झेप घेरे पाखरा (चित्रपट- आराम हराम आहे)
  • ऊठ ऊठ पंढरीनाथा (चित्रपट- झाला महार पंढरीनाथ)
  • कुठे शोधिसी रामेश्वर (भावगीत)
  • जग हे बंदीशाळा (चित्रपट- जगाच्या पाठीवर)
  • डाव मांडून मांडून मोडू नको (भावगीत)
  • तुज सगुण म्हणू की निर्गुण रे (संत-गीत)
  • तुझे गीत गाण्यासाठी (भावगीत)
  • तुझे रूप चित्ती राहो (चित्रपट- गोरा कुंभार)
  • तोच चंद्रमा नभात (भावगीत)
  • दिसलीस तू फुलले ऋतू (भावगीत)
  • देव देव्हाऱ्यात नाही (चित्रपट- झाला महार पंढरीनाथ)
  • देवा तुला दया येईना कशी (चित्रपट- पाटलीण)
  • देहाची तिजोरी (चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा)
  • धीरे जरा गाडीवाना (चित्रपट- नरवीर तानाजी)
  • नवीन आज चंद्रमा (चित्रपट- उमज पडेल तर)
  • प्रिया आज माझी नसे साथ द्याया (भावगीत)
  • बाई मी विकत घेतला शाम (चित्रपट- जगाच्या पाठीवर)
  • बोलत नाही वीणा (चित्रपट- पडदा)
  • मानवतेचे मंदिर माझे (चित्रपट- ते माझे घर)
  • यशवंत हो जयवंत हो (चित्रपट- भिंतीला कान असतात)
  • लाडकी शकुंतला (चित्रपट- सुवासिनी)
  • वज्र चुड्याचे हात जोडता
  • विठ्ठला तू वेडा कुंभार (चित्रपट- प्रपंच)
  • सखि मंद झाल्या तारका (भावगीत)
  • स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (चित्रपट- बाळा जो जो रे)
  • स्वर आले दुरुनी (भावगीत)

गीतरामायण

संपादन

कवी ग दि माडगूळकर यांचे अजरामर गीतरामायण ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कामांपैकी एक आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीवर एक वर्ष १९५५-५६ पर्यंत चालला. हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की, या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते. फडके यांनी यातील सर्व ५६ गाणी संगीतबद्ध केली आणि ती वेगवेगळ्या गायकांनी गायली (माणिक वर्मा, ललिता देऊलकर, लता मंगेशकर, फडके स्वतः, वसंतराव देशपांडे, राम फाटक, उषा अत्रे). सर्व ५६ गाणी फडके यांनीही त्यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली.

सुधीर फडके यांच्या कारकिर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीतरामायण. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये गदिमांनी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत.

गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ट्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी अर्थामध्ये एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात.

बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी स्वदेशात तसेच परदेशांत केले.

पुरस्कार

संपादन
 
सह्याद्री स्वररत्न पुरस्कार स्वीकारताना

१. राष्ट्रपती पदक (१९६३) - हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी.
२. सह्याद्री स्वररत्न पुरस्कार (२००२)
३. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८)
४. लता मंगेशकर पुरस्कार (२००१)
५. अल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१)

सन्मान

संपादन

सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक कार्यक्रम होत असतात, त्यांपैकी काही हे :-

  • पिंपरी प्राधिकरणातील मधुगंधर्व संस्थेतर्फे शाहूनगर येथे सुधीर फडके स्मृती गायन स्पर्धा

चरित्रग्रंथ

संपादन
  • जगाच्या पाठीवर (आत्मचरित्र)
  • स्वरश्री बाबूजी : लेखक वसंत वाळुंजकर

सन्मान

संपादन
  • मुंबईतील बोरीवली पूर्व या भागातील एका उड्डाणपुलाला सुधीर फडके यांचे नाव दिले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ M.D, Gangadhar Maddiwar (2011-01-25). Eternal Happiness: Wisdom Gained as a Volunteer Surgeon (इंग्रजी भाषेत). Xlibris Corporation. ISBN 978-1-4568-3583-5.