रवीश कुमार
रवीश कुमार (५ डिसेंबर १९७४) हे एक भारतीय पत्रकार आणि लेखक आहेत.[१][२][३] ते एनडीटीव्ही इंडियाचे माजी वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत. या वाहिनीचे लोकप्रिय कार्यक्रम प्राइम टाइम, हम लोग, रविश की रिपोर्ट आणि देस की बात यांचे सूत्रसंचालन करत होते.
रवीश कुमार | |
---|---|
जन्म |
५ डिसेंबर १९७४ पूर्व चंपारण्य, बिहार |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा |
|
प्रसिद्ध कामे |
|
ख्याती |
|
जोडीदार | नयना दासगुप्ता |
पुरस्कार |
|
संकेतस्थळ http://www.naisadak.org/ |
रवीश यांना २०१९ मध्येआशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. "गरीब आणि सामान्य जनतेचा आवाज सार्वजनिक मंचावर उठवल्याबद्दल"[४] पत्रकारिता क्षेत्रामधील त्यांच्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
रवीश यांना दोनदा रामनाथ गोयंका पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट पत्रकार या श्रेणीत त्यांना सन्मानित करण्यात आले.[५] २०१६ मध्ये द इंडियन एक्सप्रेसने आपल्या "१०० सर्वाधिक प्रभावशाली भारतीय लोकांमध्ये" रवीश कुमारांना समाविष्ट केले.[६]
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
संपादनकुमार यांचा जन्म ५ डिसेंबर १९७४ रोजी बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील अरेराजजवळील जितवारपूर गावात बळीराम पांडे यांच्या घरी झाला. त्यांनी आपले उच्च माध्यमिक शिक्षण पाटणा येथील लोयोला हायस्कूलमधून घेतले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते दिल्लीला गेले. दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या देशबंधू महाविद्यालयातून ते पदवीधर झाले. अखेरीस त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून हिंदी पत्रकारितेच्या पदव्युत्तर डिप्लोमामध्ये प्रवेश घेतला.
कारकीर्द
संपादनरवीश यांनी एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून काम केले. या चॅनेलचे प्रमुख कार्यक्रम प्राइम टाइम, हम लोग, रविश की रिपोर्ट आणि देस की बात यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत होते. पत्रकारितेसाठी यापूर्वी अनेकदा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.[७]
पुरस्कार आणि सन्मान
संपादनकुमार यांना त्यांच्या पत्रकारितेतील कामासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार (२०१९) यासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हिंदी भाषेतील प्रसारण श्रेणीसाठी रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड (२०१७ आणि २०१३) दोन वेळा त्यांना देण्यात आला. पत्रकारितेसाठी त्यांना गौरी लंकेश पुरस्कार, पहिला कुलदीप नायर पत्रकारिता पुरस्कार (२०१७), हिंदी पत्रकारिता आणि सर्जनशील साहित्यासाठी गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार (२०१० साठी, २०१४ मध्ये प्रदान करण्यात आला) इत्यादी पुरस्कार प्राप्त आहेत.
द इंडियन एक्स्प्रेसने १०० सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या (२०१६) यादीत त्यांचा समावेश केला होता. तसेच मुंबई प्रेस क्लबने त्यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणूनही निवडले होते.
वैयक्तिक आयुष्य
संपादनरवीश यांचे लग्न दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमध्ये इतिहास शिकवणाऱ्या नयना दासगुप्तांशी झाले. त्यांना दोन मुली आहेत.[८]
पुस्तके
संपादन- द फ्री व्हॉइस: ऑन डेमोक्रसी, कल्चर अँड द नेशन (इंग्रजी)
- बोलना ही है : लोकतंत्र, संस्कृती और राष्ट्र के बारे में (हिंदी)
- इश्क में शहर होना (हिंदी)
- देखते रहे (हिंदी)
- रविशपंती (हिंदीमध्ये)
- ए सिटी हॅपन्स इन लव्ह
हेही पाहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Indian journalist Ravish Kumar receives 2019 Ramon Magsaysay Award - The Hindu". web.archive.org. 2019-12-28. रोजी मूळ पानापासून संग्रहित2019-12-28. 2022-01-02 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "जन्मदिन विशेष: कौन हैं और क्या करती हैं रवीश कुमार की पत्नी, जानिए कैसी है लाइफस्टाइल". Jansatta (हिंदी भाषेत). 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ Puri, Anjali (2016-12-02). "Ravish Kumar: The rooted anchor".
- ^ ""Truth Essential To Democracy": Ravish Kumar Receives Magsaysay Award". NDTV.com. 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ "Ramnath Goenka Excellence in Journalism Awards: Full list of winners". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-12-22. 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ "#ie100: Narendra Modi to Ravish Kumar, the most powerful Indians". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-04-14. 2022-01-02 रोजी पाहिले.
- ^ "NDTV's Ravish Kumar says death threats have increased" (इंग्रजी भाषेत). Special Correspondent. New Delhi. 2018-05-25. ISSN 0971-751X.CS1 maint: others (link)
- ^ "The Peace Maker". https://www.outlookindia.com/ (इंग्रजी भाषेत). 2022-02-05. 2022-06-03 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)