रघुनाथराव पेशवे

(रघुनाथ बल्लाळ भट या पानावरून पुनर्निर्देशित)


रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (१६ डिसेंबर, १७२१ - ११ डिसेंबर, १७८३) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाबअफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.

रघुनाथराव पेशवे
ब्रिटिश चित्रकार जेम्स फोर्ब्स याने रेखलेले रघुनाथरावाचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स. १८१३)
पूर्ण नाव रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
जन्म ऑगस्ट १८, इ.स. १७३४
मृत्यू इ.स. १७८२
पूर्वाधिकारी माधवराव
उत्तराधिकारी सवाई माधवराव
वडील बाजीराव बल्लाळ
आई काशीबाई
पत्नी आनंदीबाई
संतती अमृतराव, बाजीराव (दुसरा)

रघुनाथराव हे शूर सेनापती आणि लष्करी डावपेचांत उजवे होते. त्यांनी उत्तर भारतात पराक्रमाची शर्थ केली होती. १७५७मध्ये त्यांनी खुद्द दिल्लीवर चाल करून शहर जिंकले होते.

पेशवाईसाठी प्रयत्न

संपादन

नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मधला मुलगा माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली कारण नानासाहेबांचा थोरला पूत्र पानिपतच्या युद्धात मारले गेले होते. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले. रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बऱ्याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.