यूएस महामार्ग २४
यूएस महामार्ग २४ (यूएस २४) हा अमेरिकेतील एक महामार्ग आहे. हा कॉलोराडो राज्यातील मिनटर्न गावापासून मिशिगनमधील क्लार्कस्टन शहराचे उपनगर असलेल्या इन्डिपेन्डन्स टाउनशिप पर्यंत धावतो.
हा रस्ता १९२६मध्ये बांधून झालेल्या अमेरिकेतील महामार्गांपैकी एक आहे. आता हा रस्ता पश्चिमेस कॉलोराडोमध्ये आय-७०शी असलेल्या तिठ्यापासून पूर्वेस मिशिगनमधील आय-७५शी असलेल्या तिठ्यापर्यंत वाढविण्यात आला आहे.
मार्ग वर्णन
संपादनकॉलोराडो
संपादनयूएस २४ कॉलोराडोमध्ये मिनटर्न गावाजवळ आय-७० आणि यूएस ६च्या तिठ्याजवळून सुरू होतो. येथून यूएस २४ आग्नेयेस मिनटर्न गावातून दक्षिणेस टेनेसी पास या घाटात जातो. या घाटात हा रस्ता कॉन्टिनेन्टल डिव्हाइड ओलांडतो व पॅसिफिक पाणलोट क्षेत्रातून अटलांटिक पाणलोट क्षेत्रात येतो. तसाच दक्षिणेकडे जात हा रस्ता लेडव्हिल, जॉन्सन व्हिलेज जवळ यूएस २८५ला मिळतो. ट्राउट क्रीक पास हा घाट ओलांडल्यावर २४ आणि २८५ परत विभक्त होतात आणि यूएस २४ पूर्वेकडे जात वूडलँड पार्क आणि यूट पास घाटातून कॉलोराडो स्प्रिंग्जमध्ये उतरतो. येथून हा रस्ता ईशान्येस लायमन येथे आय-७०ला मिळतो व कॅन्सस पर्यंत आय-७०वरून धावतो.
कॅन्सस
संपादनयूएस २४ कॅन्ससमध्ये पश्चिमेकडून कानोराडो गावाजवळ प्रवेश करतो. आय-७० बरोबर ४५ मैल (७२ किमी) कोल्बी पर्यंत धावल्यावर हा वेगळा होतो आणि पुन्हा कॅन्सस सिटी पर्यंत पुन्हा आय-७०ला भेटत नाही. १ डिसेंबर २००८ पासून यूएस २४ हा यूएस ७३द्वारे दक्षिणेस जातो आणि शहराच्या पूर्वेस पुन्हा आय-७०ला मिळतो आणि कॅन्ससमधील शेवटचे १६ मैल (२६ किमी) धावतो. यूएस २४ वर कॅन्ससची मॅनहॅटन, टोपेका आणि लॉरेन्स शहरांतून जातो.
मिसूरी
संपादनमिसूरी मध्ये यूएस २४ वेवर्ली आणि कॅरल्टन दरम्यान यूएस ६५ बरोबर धावतो आणि वेवर्लीजवळ मिसूरी नदी ओलांडतो. यानंतर दोन मार्गिकांचा झालेला हा रस्ता कीट्सव्हील आणि हंट्सव्हिल मधून जातो. त्यानंतर हा रस्ता पुन्हा चार मार्गिकांचा होतो. यापुढे मन्रो सिटे येथे पुन्हा एकदा मन्रो सिटीमध्ये यूएस ३६ला मिळतो. पुढे यूएस २४ यूएस ६१ बरोबर पाल्मिरा ते वेस्ट क्विन्सी पर्यंत जातो. हा विभाग अॅव्हेन्यू ऑफ द सेंट्सचा भाग आहे.
मिसूरीमध्ये यूएस २४ कॅन्सस सिटी, इंडिपेंडन्स, बकनर, लेक्सिंग्टन, वेव्हरली, कॅरोलटन, कीट्सव्हिल, मोबर्ली, मॅडिसन, मन्रो सिटी, पाल्मिरा आणि वेस्ट क्विन्सी या शहरांतून जातो.
इन्डिपेन्डन्समध्ये हॅरी एस. ट्रुमन राष्ट्राध्यक्षीय ग्रंथालय आणि संग्रहालय या रस्त्यावर आहे.
इलिनॉय
संपादनयूएस २४ मिसूरीमधून इलिनॉयमध्ये क्विन्सी शहराजवळ येतो. सीमेवर असलेल्या मिसिसिपी नदीवरील लटकणारा क्विन्सी बे व्ह्यू ब्रिज (पश्चिमवाहू) आणि जुना क्विन्सी मेमोरियल ब्रिज (पूर्ववाहू) या जुळ्या पुलांवरून हा शहरात येतो. येथून हा रस्ता ईशान्येकडे पियोरियाला जातो. हा रस्ता जुन्या पियोरिया-क्विन्सी स्टेज कोच मार्गावरून जातो. पियोरियाजवळ आल्यावर यूएस २४ आय-४७४द्वारे शेड-लोहमन ब्रिज पूलावरून शहराला वळसा घालतो.
येथून हा रस्ता थेट पूर्व दिशेला धावतो. येथा टोलिडो, पियोरिया अँड वेस्टर्न रेल्वेचा मार्ग रस्त्याला समांतर आहे. येथून पुढे शेल्डन येथे हा रस्ता इंडियानामध्ये शिरतो.
इंडियाना
संपादनइंडियानामध्ये आल्यावर यूएस २४ पूर्वेकडे हंटिंग्टनला जाउन ईशान्येकडे फोर्ट वेनपर्यंत जातो. येथे हा रस्ता आय-६९ आणि आय-४६९वरून शहराला वळसा घालत पूर्वेला ओहायोमध्ये जातो.
ओहायो
संपादनयूएस २४ अँटवर्पजवळ ओहायोमध्ये शिरतो. ओहायोमध्ये हा रस्ता टोलेडोच्या दिशेने मौमी नदीला समांतर जातो.
नेपोलियन आणि टोलेडो दरम्यान हा रस्ता इंटरस्टेट महामार्गाच्या निकषांनुसार बांधलेला आहे. मौमी नदीच्या उत्तर किनाऱ्यावरून हा रस्ता वॉटरव्हिलजवळच्या फॉलन टिंबरच्या लढाईच्या रणांगणाजवळून जातो. या लढाईमध्ये मूळ रहिवाशांना हरवून अमेरिकेच्या श्वेतवर्णीयांनी उत्तर ओहायोमध्ये शिरकाव केला.
येथून पुढे यूएस २४ उत्तरेस मिशिगन सीमेपर्यंत जातो.
मिशिगन
संपादनयूएस २४ मिशिगनमध्ये टोलेडो जवळून प्रवेश करतो आणि मन्रो शहर आणि डेट्रॉईट महानगरक्षेत्राच्या पश्चिम सीमेकडून उत्तरेस जातो. येे आय-६९६, एम-१० आणि लॅशर रोड पार करतो. हा चौफुला "मिक्सिंग बोल" म्हणून ओळखला जातो. येथून पुढे यूएस २४ वॉटरफोर्ड आणि पॉन्टियाक शहरांच्यामधून इंडिपेंडन्स टाउनशिप पर्यंत जातो. येथे या रस्त्याचा पूर्व/उत्तर आरंभबिंदू आहे.
प्रमुख चौफुले
संपादन- कॉलोराडो
- मिनटर्नच्या वायव्येस
- जॉन्सन व्हिलेज जवळ. हे दोन्ही रस्ते येथून अँटेरो जंक्शनपर्यंत एकत्र धावतात.
- कॉलोराडो स्प्रिंग्ज शहरातून हे तिन्ही रस्ते एकत्र धावतात.
- लायमनच्या पूर्वेस हे महामार्ग एकत्र धावतात.
- लायमन पासून सीबर्ट पर्यंत दोन्ही महामार्ग एकत्र धावतात.
- बर्लिंग्टन शहरातून एकत्र.
- बर्लिंग्टनपासून कॅन्ससमधील लेव्हांत गावापर्यंत एकत्र.
- कॅन्सस
- जेमजवळ.
- हिल सिटीमध्ये.
- स्टॉक्टनमध्ये.
- ऑस्बोर्न पासून पोर्टिस पर्यंत एकत्र.
- ग्लास्कोजवळ.
- रायली पासून एकत्र.
- टोपेकामध्ये
- विल्यम्सटाउन पासून लॉरेन्सपर्यंत एकत्र.
- लॉरेन्सपासून यूएस ४० कॅन्सस सिटीपर्यंत एकत्र.
- कॅन्सस सिटी–बॉनर स्प्रिंग्ज सीमेपासून शहरात एकत्र प्रवेश.
- बॉनर स्प्रिंग्ज पासून कॅन्सस सिटी पर्यंत एकत्र.
- कॅन्सस सिटी-–एडवर्ड्सव्हिल सीमेवर.
- कॅन्सस सिटीमध्ये.
- कॅन्सस सिटी शहरातून एकत्र धावतात.
- कॅन्सस सिटीमध्ये.
- कॅन्सस सिटीमध्ये. यूएस १६९ कॅन्सस सिटी (मिसूरी) पर्यंत एकत्र.
- मिसूरी
- कॅन्सस सिटी, मिसूरीमधून एक्र धावतात.
- कॅन्सस सिटीमध्ये.
- कॅन्सस सिटीमध्ये.
- वेवर्ली पासून कॅरल्टनपर्यंत एकत्र.
- मोबर्लीमध्ये.
- मन्रो सिटी पासून रेन्सेलॅर पर्यंत एकत्र.
- पाल्मिराच्या दक्षिणेपासून टेलर पर्यंत एकत्र.
- इलिनॉय
- ब्लूमफील्डच्या दक्षिणेस.
- रशव्हिल
- बेटी पासून डंकन मिल्स पर्यंत एकत्र.
- पियोरिया आणि बार्टनव्हिलच्या मध्ये. आय-४७४ आणि यूएस २४ येथून क्रीव्ह सूर पर्यंत एकत्र धावतात..
- ईस्ट पियोरियामधून दोन्ही मार्ग एकत्र धावतात.
- ईस्ट पियोरियामध्ये.
- एल पासोमध्ये.
- चेनोआमध्ये.
- गिलमनमध्ये.
- गिलमनमधून एकत्र.
- शेल्डन ते केंटलंड पर्यंत.
- इंडियाना
- केंटलंडमध्ये.
- रेमिंग्टन ते वॉलकॉट पर्यंत एक्र.
- रेमिंग्टनच्या पूर्वेस
- रेनॉल्ड्स े माँटिचेलोपर्यंत.
- लोगनस्पोर्टजवळ.
- पेरू टाउनशिप
- हंटिंग्टन
- फोर्ट वेन शहरात.
- फोर्ट वेनमध्ये. यूएस २४ आणि यूएस ३० येथून न्यू हेवन पर्यंत एकत्र धावतात..
- फोर्ट वेन मध्ये.
- फोर्ट वेन मध्ये. यूएस २४ आणि आय-४६९ येथून न्यू हेवनपर्यंत एकत्र धावतात..
- ओहायो
- एमेराल्ड टाउनशिपमध्ये.
- in नेपोलियन टाउनशिप पासून लिबर्टी टाउनशिपपर्यंत एकत्र.
- मौमीमध्ये.
- मौमीमध्ये.
- टोलिडोमध्ये.
- मिशिगन
- अॅश टाउनशिपमध्ये.
- Tटेलरमध्ये.
- डीयरबॉर्नमध्ये.
- रेडफर्डमध्ये.
- साउथफील्डमध्ये.
- स्प्रिंगफील्ड टाउनशिपमध्ये.