मुघल साम्राज्य

मुग़ल
(मोगलशाही या पानावरून पुनर्निर्देशित)

.

मुघल साम्राज्य
شاهان مغول(फारसी)

मुघ्लिया सल्तनत (उर्दु व तुर्की)

दौलत अल तैमुरिया (अरबी)


१५२६ - १८५८
राजधानी आग्रा, दिल्ली
राजे १५२६ - १५३०: बाबर
१५३० - १५३९
१५५५ - १५५६: हुमायूँ
१५५६ - १६०५: अकबर
१६०५ - १६२७: जहांगीर
१६२८ - १६५८: शाह जहान
१६५८ - १७०७: औरंगजेब
१७०७ - १७१२: बहादूर शाह
१७१२ - १७१३: जहांदर शाह
१७१३ - १७१९: फरूखसियार
भाषा फारसी,उर्दु,हिन्दुस्तानी,अरबी,चगताई तुर्की
क्षेत्रफळ सुमारे ३० लाख वर्ग किमी
लोकसंख्या १५ कोटी
चलने रुपया,

मोगल साम्राज्य (फारसी: شاهان مغول ) हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे त्याने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायूँने शेरशाह सूरी बरोबरच्या लढाईत गमावले. चौदा वर्षांनंतर नंतर पानिपतच्या पहिल्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मुलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ.स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली.१७०७ पासून ते १८५८ या काळात उत्तर मुघल साम्राज्य होते. मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह बहादुरशाह जफर हा होता. १८५८ साली ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेऊन मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन