मॅक्स मिर्न्यी

बेलारशियन टेनिसपटू

मॅक्स मिर्न्यी (बेलारूशियन: Максім Мікалаевіч Мірны; ६ जुलै १९७७) हा एक बेलारूशियन टेनिसपटू आहे. १९९६ साली व्यावसायिक खेळात पदार्पण केलेल्या मिर्न्यीला एकेरीमध्ये विशेष यश मिळाले नाही. परंतु पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी टेनिसमध्ये त्याने आजवर अनेक अजिंक्यपदे जिंकली आहेत. मिर्न्यीने आजवर ६ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांची पुरुष दुहेरी अजिंक्यपदे मिळवली आहेत ज्यांपैकी एकामध्ये त्याचा जोडीदार भारताचा महेश भूपती होता. ह्याचबरोबर मिर्न्यीने चार वेळा मिश्र दुहेरीमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

मॅक्स मिर्न्यी
देश बेलारूस ध्वज बेलारूस
वास्तव्य ब्रॅन्डन्टन, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म ६ जुलै, १९७७ (1977-07-06) (वय: ४७)
मिन्स्क, बेलारूशियन सोसाग, सोव्हिएत संघ
सुरुवात १९९६
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन २३९ - २४०
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १८
दुहेरी
प्रदर्शन ५९९ - २९४
अजिंक्यपदे ३७
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उप-विजयी (२००७)
फ्रेंच ओपन विजयी (२००५, २००६, २०११, २०१२)
विंबल्डन उप-विजयी (२००३)
यू.एस. ओपन विजयी (२०००, २००२)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उप-विजयी (१९९९, २००७)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१२)
विंबल्डन विजयी (१९९८)
यू.एस. ओपन विजयी (१९९८, २००७, २०१३)
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
बेलारूसबेलारूस या देशासाठी खेळतांंना
मिश्र दुहेरी टेनिस
सुवर्ण २०१२ लंडन मिश्र दुहेरी

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मिर्न्यीने आपल्या देशाच्या व्हिक्टोरिया अझारेन्कासोबत बेलारूससाठी मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळवले.

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार सहकारी प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१२ लंडन गवताळ बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का युनायटेड किंग्डम लॉरा रॉब्सन
युनायटेड किंग्डम अँडी मरे
2–6, 6–3, [10–8]

बाह्य दुवे

संपादन