मिसिसिपी नदी

उत्तर अमेरिकेतील एक नदी
(मिसिसीपी नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

मिसिसिपी नदी (इंग्लिश: Mississippi River) ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला मिळते. ही नदी मिनेसोटालुईझियाना ह्या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसीमिसिसिपी ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोवा, मिसूरीआर्कान्सा ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.

मिसिसिपी नदी
मेम्फिसमधील मिसिसिपी नदीवरील एक पूल
उगम इटास्का सरोवर, मिनेसोटा 47°13′05″N 95°12′26″W / 47.21806°N 95.20722°W / 47.21806; -95.20722
मुख मेक्सिकोचे आखात 29°9′4″N 89°15′12″W / 29.15111°N 89.25333°W / 29.15111; -89.25333
पाणलोट क्षेत्रामधील देश Flag of the United States अमेरिका
मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसीमिसिसिपी, आयोवा, मिसूरी, आर्कान्सालुईझियाना
लांबी ३,७३० किमी (२,३२० मैल)
उगम स्थान उंची ४५० मी (१,४८० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २९,८१,०७६
उपनद्या मिनेसोटा नदी, मिसूरी नदी, ओहायो नदी, आर्कान्सा नदी, इलिनॉय नदी, टेनेसी नदी
उगमापासून मुखापर्यंत मिसिसिपी नदीचा मार्ग व प्रमुख उपनद्या


मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. मिसूरीओहायो ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत.


मोठी शहरे

संपादन


 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: