मिनीयापोलिस-सेंट पॉल
मिनियापोलिस-सेंट पॉल हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील महानगर आहे. हे महानगर मिसिसिपी, मिनेसोटा आणि सेंट क्रॉई नद्यांच्या संगमाभोवती वसलेले आहे. हे महानगर मिनियापोलिस आणि सेंट पॉल या मोठ्या शहरांसह अनेक शहरांनी बनलेले आहे. या भागाला ट्विन सिटीझ असेही म्हणतात.[१] [२] हे महानगर मिनेसोटाचे आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे.
metropolitan area in Minnesota, United States | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | metropolitan statistical area, जुळी शहरे | ||
---|---|---|---|
स्थान | मिसिसिपी नदी, मिनेसोटा, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
Located in/on physical feature | मिसिसिपी नदी | ||
लोकसंख्या |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
मिनियापोलिस बव्हंश मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला सरोवराच्छादित भूभागावर वसलेले आहे. शहराचा बहुतांश भाग हा निवासी परिसर असला तरी, त्यात मिल डिस्ट्रिक्ट आणि नॉर्थ लूप क्षेत्रासह काही ऐतिहासिक औद्योगिक क्षेत्रे आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग व्यवसायांनी भरगच्च आहे. सेंट पॉल शहर मुख्यतः मिसिसिपीच्या पूर्वेस वसलेले आहे. तेथील मध्यवर्तीभाग तुलनेने लहान आहे. सेंट पॉल मधील अनेक परिसर वृक्षाच्छादित असून येथील इमारती व्हिक्टोरियन वास्तुशैलीत बांधलेली आहेत. शहरे आणि आजूबाजूच्या लहान शहरांमध्ये शेकडो तलाव, टेकड्या आणि खाड्या आहेत.
मूळतः ओजिब्वे आणि डकोटा लोकांची वस्ती असलेली ही शहरे नंतर विविध युरोपियन लोकांनी वसवली होती. मिनियापोलिसवर सुरुवातीच्या स्कॅन्डिनेव्हियन आणि लुथेरन स्थायिकांचा मोठा प्रभाव होता, तर सेंट पॉल हे प्रामुख्याने फ्रेंच, आयरिश आणि जर्मन कॅथलिकांनी वसवले होते. दोन्ही शहरी भागात मेक्सिकन, सोमाली, हमोंग, भारतीय, ओरोमो, व्हिएतनामी, कॅमेरोनियन आणि लायबेरियन्ससह अनेक नव्याने स्थलांतरित समूह राहतात.
काउंट्या
संपादनअनेकदा ट्विन सिटीझ प्रदेशात येथील सात काउंट्याचा समावेश होतो. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,९०२६१ इतकी होती. याच्या आसपासच्या २१ काउंट्यांच्या प्रदेशात ४०,७८,७८८ व्यक्ती राहतात.
शहरे आणि उपनगरे
संपादनट्विन सिटीझ महानगर प्रदेशात अंदाजे २१८ नगरपालिका आहेत. यामध्ये विस्कॉन्सिनमधील काही नगरपालिका आणि गावांचाही समावेश होतो. [३]
प्रमुख शहरे
संपादन- मिनियापोलिस (४२९,९५४)
- सेंट पॉल (३११,५२७)
५०,००० ते ९९,९९९ रहिवासी असलेली शहरे
संपादन
- ब्लूमिंग्टन (८९,९८७)
- ब्रूकलिन पार्क (८६,४७८)
- प्लिमथ (८१,२०६)
- वूडबरी (७५,१०२)
- मेपल ग्रोव्ह (७०,२५३)
- ब्लेन (७०,२२२)
- लेकव्हिल (६९,४९०)
- ईगन (६८,८५५)
- बर्न्सव्हिल (६४,३१७)
- ईडन प्रेरी (६४,१९८)
- कून रॅपिड्स (६३,५९९)
- अॅॅपल व्हॅली (५६,३७४)
- मिनेटोंका (५३,७८१)
- इडायना (५३,४९४)
- सेंट लुइस पार्क (५०,०१०)
२५,००० ते ४९,९९९ रहिवासी असलेली ठिकाणे
संपादन- शॅकोपी (४३,६९८)
- मेपलवूड (४२,०८८)
- कॉटेज ग्रोव्ह (३८,८३९)
- रिचफील्ड (३६,९९४)
- रोझव्हिल (३६,२५४)
- इन्व्हर ग्रोव्ह हाइट्स (३५,८०१)
- ब्रूकलिन सेंटर (३३,७८२)
- अँडोव्हर (३२,६०१)
- सॅव्हेज (३२,४६५)
- फ्रीडली (२९,५९०)
- ओकडेल (२८,३०३)
- चास्का (२७,८१०)
- रॅम्सी (२७,६४६)
- प्रायर लेक (२७,६१७)
- शोरव्ह्यू (२६,९२१)
- चॅनहॅसेन (२५,९४७)
- एल्क रिव्हर (२५,८३५)
- रोझमाउंट (२५,६५०)
१०,००० ते २४,९९९ रहिवासी असलेली ठिकाणे
संपादन- व्हाइट बेर लेक (२४,८८३)
- चँपलिन (२३,९१९)
- फार्मिंग्टन (२३,६३२)
- न्यू ब्रायटन (२३,४५४)
- क्रिस्टल (२३,३३०)
- गोल्डन व्हॅली (२२,५५२)
- हेस्टिंग्ज (२२,१५४)
- न्यू होप (२१,९८६)
- कोलंबिया हाइट्स (२१,९७३)
- लिनो लेक्स (२१,३९९)
- साउथ सेंट पॉल (२०,७५९)
- वेस्ट सेंट पॉल (२०,६१५)
- फॉरेस्ट लेक (२०,६११)
- ओट्सेगो (१९,९५६)
- स्टिलवॉटर (१९,३९४)
- हॉपकिन्स (१९,०७९)
- सेंट मायकेल (१८,२३५)
- अनोका (१७,९२१)
- हॅम लेक (१६,४६४)
- रिव्हर फॉल्स (१६,१८२)
- बफेलो (१६,१६८)
- ह्युगो (१५,७६६)
- हडसन (१४,७५५)
- रॉबिन्सडेल (१४,६४६)
- माँटिचेलो (१४,४५५)
- रॉजर्स (१३,२९५)
- माउंड्स व्ह्यू (१३,२४९)
- वेकोनिया (१३,०३३)
- व्हदनैस हाइट्स (१२,९१२)
- नॉर्थ सेंट पॉल (१२,३६४)
- ईस्ट बेथेल (११,७८६)
- मेंडोटा हाइट्स (११,७४४)
- बिग लेक (११,६८६)
- लेक एल्मो (११,३३५)
- लिटल कॅनडा (१०,८१९)
- नॉर्थ ब्रांच (१०,७८७)
- व्हिक्टोरिया (१०,५४६)
मिनियापोलिस-सेंट पॉलमधील व्यावसायिक क्रीडा संघ
संपादनक्लब | खेळ | लीग | स्थळ | शहर | पासून | विजेतेपद |
---|---|---|---|---|---|---|
मिनेसोटा ट्विन्स | बेसबॉल | अमेरिकन लीग, मेजर लीग बेसबॉल | टारगेट फील्ड | मिनीयापोलिस | १९६१ | १९८७, १९९१ |
सेंट पॉल सेंट्स | बेसबॉल | इंटरनॅशनल लीग, मेजर लीग बेसबॉल | सीएचएस फील्ड (सेंट पॉल) | सेंट पॉल | १९९३ | २०१९ (AA) १९९३, १९९५, १९९६, २००४ (NL) |
मिनेसोटा व्हायकिंग्स | अमेरिकन फुटबॉल | नॅशनल फुटबॉल लीग | यू.एस. बँक मैदान | मिनीयापोलिस | १९६१ | १९६९ (सुपर बोल नाही) |
मिनेसोटा व्हिक्सेन | अमेरिकन फुटबॉल | वीमेन्स फुटबॉल अलायन्स | सी फोम मैदान | सेंट पॉल | १९९९ | |
मिनेसोटा टिंबरवुल्व्झ | बास्केटबॉल | एनबीए | टारगेट सेंटर | मिनीयापोलिस | १९८९ | |
मिनेसोटा लिंक्स | बास्केटबॉल | डब्ल्यूएनबीए | टारगेट सेंटर | मिनीयापोलिस | १९९९ | २०११, २०१३, २०१५, २०१७ |
मिनेसोटा वाइल्ड | आइस हॉकी | एनएचएल | एक्सेल एनर्जी सेंटर | सेंट पॉल | २००० | |
मिनेसोटा फ्रॉस्ट | आइस हॉकी | एक्सेल एनर्जी सेंटर | सेंट पॉल | सेंट पॉल | २०२३ | २०२४ |
मिनेसोटा युनायटेड एफसी | फुटबॉल | मेजर लीग सॉकर | अलायन्झ फील्ड | सेंट पॉल | २०१५ | २०११ (एनएएसएल) |
वाहतूक
संपादनरस्ते आणि महामार्ग
संपादन- इंटरस्टेट
- यूएस महामार्ग
विमान वाहतूक
संपादनमिनियापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ (MSP) या प्रदेशातील मुख्य विमानतळ आहे. हा विमानतळ डेल्टा एृर लाईन्सचे प्रमुख ठाणे आहे. याशिवाय येथे सन कंट्री एरलाइन्सचे मुख्य ठाणे देखील आहे. याशिवाय या भागात ६ इतर विमानतळ आहेत. Add→{{rail-interchange}} मेट्रो
- ब्लू लाइन LRT: टारगेट फील्ड – मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ – मॉल ऑफ अमेरिका
- ग्रीन लाइन LRT: टारगेट फील्ड स्थानक – मिनेसोटा विद्यापीठ – युनियन डेपो
- ऑरेंज लाइन BRT: डाउनटाउन मिनीयापोलिस – बर्न्सव्हिल
- रेड लाइन BRT: मॉल ऑफ अमेरिका – अॅपल व्हॅली वाहतूक स्थानक
- ए लाइन BRT: फॉर्टी सिस्क्थ स्ट्रीट स्थानक – रोझडेल वाहतूक केंद्र
- सी लाइन BRT: डाउनटाउन मिनीयापोलिस – ब्रुकलिन केंद्र वाहतूक केंद्र
- डी लाइन BRT: मॉल ऑफ अमेरिका – ब्रुकलिन सेंटर वाहतूक केंद्र
संदर्भ
संपादन- ^ Ode, Kim (January 22, 2018). "Use this English-Minnesotan dictionary when you're in the Land of Lakes". Star Tribune. 23 August 2023 रोजी पाहिले.
- ^ Montgomery, David (December 8, 2021). "What does the phrase 'The Twin Cities' refer to?". MPR News. 23 August 2023 रोजी पाहिले.
- ^ 2020 U.S.Census