माउंट एल्बर्ट अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. १४,४४० फूट (४,४०१ मी) उंचीचे हे शिखर रॉकी माउंटन्समधील सर्वोच्च तर अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. हे शिखर लेडव्हिलपासून अंदाजे १६ किमी (१० मैल) आग्नेयेस आहे.

माउंट एल्बर्ट
center}}
माउंट एल्बर्ट
उंची
१४,४४० फूट (४,४०१ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
कॉलोराडो, रॉकी माउंटन्समध्ये सर्वोच्च
ठिकाण
लेक काउंटी, कॉलोराडो, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
सावाच पर्वतरांग
गुणक
(शोधा गुणक)
पहिली चढाई
इ.स. १८७४
सोपा मार्ग


कॉलोराडोतील राजकारणी व कॉलोराडो प्रदेशाचा गव्हर्नर असलेल्या सॅम्युएल हिट एल्बर्टचे नाव या शिखराला देण्यात आले आहे. हेन्री सकल याने इ.स. १८७४मध्ये या शिखरावर चढाई केल्याची सगळ्यात जुनी नोंद आहे.