सगुणाबाई भोसले द्वितीय

(महाराणी सगुणाबाई (द्वितीय) या पानावरून पुनर्निर्देशित)


महाराणी सगुणाबाई भोसले ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी होत्या. त्या मोहिते घराण्यातील होत्या. त्यांच्या मुलीचे नाव राजसबाई होते. छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी सगुणाबाई यांचे पुत्र संभाजीराजे बालपणीच वारले. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक पुत्र रामराजे छत्रपती हे शाहू राजांच्या मृत्यूनंतर छत्रपती झाले. त्यांचा मृत्यू इ.स. १७४८ साली सातारा येथे झाला. त्यांची समाधी संगम माहुली येथे आहे.

महाराणी सगुणाबाई शाहूराजे भोसले
महाराणी
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ १७०८ - १७४८
राजधानी सातारा
पूर्ण नाव सगुणाबाई शाहूराजे भोसले
पदव्या महाराणी
मृत्यू २५ ऑगस्ट १७४८
सातारा, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी महाराणी सकवारबाई (द्वितीय)
पती छत्रपती सम्राट शाहू महाराज
संतती संभाजीराजे,
राजसबाई
राजघराणे भोसले
चलन होन