महाप्रशासक व शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई

महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे महाराष्ट्र शासनाच्या ‍विधि व न्याय विभागाचे अधिनस्त कार्यालय असुन, ही कायमची स्थानापनत्व[सोप्या शब्दात लिहा] व शासकीय मुद्रा असलेली एक व्यक्तीभूत[सोप्या शब्दात लिहा] संस्था आहे.



कार्यालयाकडून अंमलबजावणी केले जाणारे अधिनियम संपादन

हया कार्यालयाचे कामकाज खाली नमूद तीन केंद्रीय अधिनियमांन्वये चालते.

1) महाप्रशासक अधिनियम, 1963                       (The Administrators-General Act, 1963),

2) शासकीय विश्वस्त अधिनियम, 1913                (The Official Trustees Act, 1913)

3) कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी अधिनियम, 1890 (The Treasurer of Charitable Endowments Act, 1890)  

उपरोक्त अधिनियमांतर्गंत  चालणारे कामकाज हे न्यायिक आणि प्रशासकीय असे संमिश्र असून, ते महाप्रशासक (महाराष्ट्र) नियमावली, 1970 सुधारित (The Administrator General (Maharashtra) Rules, 1970 as amended, शासकीय विश्वस्त (महाराष्ट्र) नियमावली 1971 सुधारित (The Official Trustee (Maharashtra) Rules, 1971 as amended   आणि कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी (महाराष्ट्र) नियमावली, 1966 (The Treasurer of Charitable Endowments (Maharashtra) Rules, 1966) अनुसार केले जाते.  

2) कार्यालयाच्या संबंधाने महत्त्वपूर्ण बाबी :-

महाप्रशासक, महाराष्ट्र राज्य या कार्यालयाचे काम महाप्रशासक अधिनियम, 1963 सुधारित (महाराष्ट्र) अधिनियम, 12 सन 2002 हया केंद्रीय अधिनियमांन्वये व तद्अनुषंगिक महाप्रशासक (महाराष्ट्र) नियमावली, 1970 सुधारित अनुसार चालते. भारतामध्ये महाप्रशासक कार्यालयाची स्थापना सन 1849 मध्ये झालेली असून, मयत व्यक्तीच्या संपत्तीचा अपहार, -हास, उधळण होऊ नये व योग्य त्या व्यक्तींमध्ये संपत्तीचे वाटप व्हावे हा सदर अधिनियमाचा मूळ हेतू आहे.  सध्याचे वित्तीय अधिकारितेनुसार, महाप्रशासक, महाराष्ट्र राज्य हे रु. 10,00,000/- पर्यंतच्या संपत्तीचे प्रशासन स्व-आदेशाने करु शकतात व  त्यावरील मूल्याच्या संपत्तीचे प्रशासन मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार केले जाते.  अधिनियमाच्या कलम 29 अनुसार महाप्रशासक, महाराष्ट्र राज्य  मयत व्यक्तीच्या रु. दहा लाख पर्यंतच्या मूल्याच्या संपत्तीकरिता मृताच्या वारसांना , जवळच्या नातेवाईकांस महाप्रशासकांचे प्रमाणपत्र देऊ शकतात.  

स्थापना संपादन

शासकीय विश्वस्त कार्यालयाची स्थापना भारतामध्ये सन 1843 मध्ये झालेली असून, कार्यालयीन कामकाज हे शासकीय विश्वस्त अधिनियम, 1913 हया केंद्रीय अधिनियमांन्वये व तद्अनुषंगिक  शासकीय विश्वस्त (महाराष्ट्र) नियमावली, 1971 सुधारित अनुसार चालते. सामान्य जनतेला खाजगी व्यक्तीला विश्वस्त म्हणून नेमण्यात येणा-या अडचणी, हालअपेष्टा व जोखीम कमी करता यावी हा या अधिनियमाचा मूळ हेतू आहे. 

महाप्रशासक व शासकीय विश्वस्त ही कायमची स्थानापनत्व व शासकीय मुद्रा असलेली एक व्यक्तीभूत संस्था आहे, प्रशासनांतर्गंत प्रत्येक संपदा व न्यासांचा स्वतंत्र लेखा ठेवला जातो व सदर लेख्यांचे शासकीय लेखा परीक्षकांकडून लेखापरीक्षणही केले जाते.

दिनांक 01 फेब्रुवारी, 1977 पासून कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी, महाराष्ट्र राज्य व शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, अभिकर्ता कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी भारताकरिता हया दोन पदांचा कार्यभार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडून महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे सोपविण्यात आला.  हया पदाचे काम कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी, 1890 हया केंद्रीय अधिनियमांन्वये व तद्अनुषंगिक कोषाध्यक्ष धर्मादाय दाननिधी (महाराष्ट्र) नियमावली, 1966 अनुसार चालते. समाजातील कोणतीही व्यक्ती विशिष्ठ उद्‍दिष्टांसाठी दाननिधी स्थापनेबाबत शासनाकडे अर्ज करून, दाननिधीचा निधी हया कार्यालयाकडे दिला जातो व अशा निधीवर आलेले व्याजरुपी उत्पन्न दाननिधीच्या प्रशासकांना विशिष्ठ उद्‍दिष्टपूर्तीकरिता दिले जाते.

पत्ता संपादन

महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई

दुसरा मजला, जुने सचिवालय (विस्तारगृह), एलफिन्स्टन कॉलेजच्या बाजूला,

महात्मा गांधी मार्ग, मुंबई 400 032

दूरध्वनी : 22814554. फॅक्स : 22841818 ईमेल : agot.ljd@maharashtra.gov.in

अधिकृत संकेतस्थळ संपादन

संदर्भ संपादन