मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था


मराठी भाषा संरक्षण समिती ही मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था या नावाने ऑक्टोबर २००० मध्ये नोंदणीकृत झाली.[] शांताराम दातार हे ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.[]


महाराष्ट्रात शासकीय, न्यायालयीन इ. सर्व व्यवहारांत मराठी भाषेचा पूर्णपणे वापर व्हावा, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.[] ठाणे जिल्हात कल्याण येथे संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय आहे.[]

  • १९९८ च्या अधिसूचनेप्रमाणे तालुका पातळीवरील न्यायालये व जिल्हा पातळीवरील न्यायालये ह्यांमध्ये पूर्णपणे मराठीतून कामकाज व्हावे
  • घटनात्मक तरतूदीप्रमाणे मराठी भाषा ही मुंबई उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा व्हावी
  • महाविद्यालयीन शिक्षणात मराठी भाषा हे शिक्षणाचे एक माध्यम म्हणून उपलब्ध करून देण्यात यावे
  • मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी

ह्या उद्देशाने विविध उपक्रमांद्वारे संस्था कार्य करत असते.[]

संदर्भ

संपादन

संदर्भसूची

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ : मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था". ७ जुलै २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.