मनोज कोल्हटकर
मनोज कोल्हटकर हे एक मराठी नाटककार, लेखक आणि नाट्यअभिनेते आहेत. झी मराठी वाहिनी वरील होणार सून मी ह्या घरची या मालिकेत ते जान्हवीच्या वडिलांची भूमिका करतात. ते मूळचे रत्नागिरीचे आहेत. मनोज कोल्हटकर यांना लहानपणापासून नाटकांची आवड होती. त्यांनी बँक ऑफ इंडियामधील नोकरी सोडून अभिनय हीच कारकीर्द करण्याचे आपल्या चाळिशीत ठरवले.
मनोज कोल्हटकर यांचे १९९५ साली लग्न झाले. त्यानंतरही ते नोकरीच्या निमित्ताने मुंबईत राहून स्वतःचे पैसे खर्च करून नाटके लिहीत आणि करीतही. स्टार थिएटर, समर्थ रंगभूमी या माध्यमांतून प्रायोगिक, व्यावसायिक नाटके करत मनोज कोल्हटकर अख्खा महाराष्ट्र फिरले.
महाराष्ट्र सरकारच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्डाचे) ते सदस्य आहेत. जानेवारी २०१३ मध्ये चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यात मनोज कोल्हटकर यांचा मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी या परिसंवादात सहभाग होता. मनोज कोल्हटकरांच्या पत्नी नंदिनी या पॅथोलॉजिस्ट आहेत.
नाटके
संपादन- टू इज कंपनी
- कालाय तस्मै नमः
चित्रपट / मालिका
संपादन- अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर आधारलेला आणि प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेला ’सत्याग्रह’ हा हिंदी चित्रपट
- 'ॲडव्हेंचर्स ऑफ हातिम’ ही हॉलिवूडच्या धर्तीवर व्हिडिओ इफेक्ट्स, कॉम्प्युटर ग्राफिक्सने सजलेली हिंदी दूरचित्रवाणी मालिका 'लाईफ ओके’ या राष्ट्रीय वाहिनीवर होती. या मालिकेत मनोज कोल्हटकर यांनी काळी जादू करणाऱ्या आणि भयावह वेशभूषा असलेल्या खलनायकी जादूगाराची भूमिका वठवली आहे.
- निखिल सिंघा यांच्या दिग्दर्शनाखाली केलेल्या `महादेव’ आणि ’बालगणेश’ या हिंदी मालिका
- कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट - `अजिंठा’ (२०१२)
- अनुबंध आणि होणार सून मी ह्या घरची या झी मराठी वरील मालिका
- छत्रपती शिवाजी, बाजीराव, फुलपाखरू, सावित्रीजोती, सांग तू आहेस का? या मराठी मालिका
पुरस्कार
संपादन- कोकण मराठी साहित्य परिषदेचा २०१२ सालचा लोकमान्य टिळक पुरस्कार
- कालाय तस्मै नमः या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा म.टा. सन्मान (२०१३)