सावित्रीजोती: आभाळाएवढी माणसं होती! ही सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित झालेली एक मराठी दूरचित्रवाहिनी मालिका असून २६ डिसेंबर २०२० रोजी ही मालिका समाप्त झाली. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. ही फुले दाम्पत्यावरील मालिका असून सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार साकारत असून जोतीराव फुले यांची भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. अक्षय पाटील या मालिकेचे क्रिएटिव्ह दिग्दर्शन करीत आहेत. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक, विचारवंत व आंबेडकर-फुले विषयाचे संशोधक हरी नरके यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.[]

सावित्रीजोती
निर्मिती संस्था दशमी क्रिएशन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २०५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी सोनी मराठी
प्रथम प्रसारण ६ जानेवारी २०२० – २६ डिसेंबर २०२०

कलाकार

संपादन

बालकलाकार

संपादन
  • तृष्णिका — लहान सावित्रीबाई
  • गंगा मोरे – सावित्रीबाईंची जवळची बहीण

संदर्भ

संपादन
  1. ^ "सावित्री-जोतिरावांच्या चरित्रावर मालिका". लोकसत्ता.