मधुबनी जिल्हा

भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.

मधुबनी जिल्ह्याचे नकाशावरील स्थान


[[चित्|250 px|इवलेसे|मधुबनी चित्रशैलीचा एक नमुना]] मधुबनी जिल्हा हा बिहारच्या ३८ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. १९७२ साली शेजारील दरभंगा जिल्ह्याचे विभाजन करून हा जिल्हा निर्माण करण्यात आला. मधुबनी जिल्हा बिहारच्या उत्तर भागात भारत-नेपाळच्या सीमेलगत वसला असून मधुबनी येथे त्याचे मुख्यालय आहे. २०११ साली मधुबनी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४५ लाख होती. मधुबनी हा भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी एक असून ह्या जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मदत मिळत आहे.

मधुबनी जिल्हा
बिहार राज्यातील जिल्हा
मधुबनी जिल्हा चे स्थान
मधुबनी जिल्हा चे स्थान
बिहार मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
मुख्यालय मधुबनी
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,५०१ चौरस किमी (१,३५२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४४,८७,३७९ (२०११)
-लोकसंख्या घनता १,३०० प्रति चौरस किमी (३,४०० /चौ. मैल)
-लिंग गुणोत्तर ९२६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ मधुबनी
-खासदार अशोक कुमार यादव
संकेतस्थळ

मधुबनी चित्रशैली ह्या जगप्रसिद्ध चित्रकलेचा उगम मधुबनी परिसरामध्येच झाला. आजच्या घडीला मधुबनी चित्रांची विक्री व निर्यात हा येथील एक प्रमुख व्यवसाय आहे. राष्ट्रीय महामार्ग २७ हा येथून धावणारा प्रमुख महामार्ग आहे. जयनगर हे भारत-नेपाळ सीमेजवळील एक नगर रेल्वेचे टर्मिनस आहे.

बाह्य दुवे

संपादन