भोरगिरी
नाव भोरगिरी
उंची ६८६ मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे, महाराष्ट्र
जवळचे गाव भोरगिरी, राजगुरूनगर-पुणे जिल्हा
डोंगररांग भीमाशंकर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


भौगोलिक स्थान संपादन

पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरुनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेड गावाचे नाव बदलून राजगुरुनगर असे ठेवण्यात आले.

राजगुरुनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावर, भीमा नदीच्या उत्तरतीरावर वसलेले आहे.

शिवाजी महाराजांच्या काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा नदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो. तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला आहे. भोरगिरी किल्ला छोटेखानी असून, पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग आणि प्रदूषणविरहित वातावरण अनुभवता येते. भोरगिरी ते भीमाशंकर हे फक्त सहा किलोमीटरचे अंतर आहे. तो एक सुंदर ट्रेक आहे. डोंगरधारेजवळून रमतगमत करता येणारा. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि अनेक रानफुले पाहायला मिळतात. भोरगिरीचा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर असली, तरी पायथ्यापासून तो जेमतेम दीडशे मीटर आहे.

भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरुनगरपासून साधारण ५५ किलोमीटर अंतरावर भोरगिरी आहे.

कसे जावे संपादन

राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे. तेथून डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पहाता येते.

भोरगिरी गाव हे पुण्यापासून ८० किमी. अंतरावर येते.

कोटेश्वर आणि भोरगिरीचा गणपती संपादन

येथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. या कोटेश्वर मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते. त्यामुळे तो डोह पवित्र झाला आहे. म्हणून आजही इथले स्थानिक उत्सवाच्या काळात इथे असलेल्या डोहात आंघोळ करतात. झंझराजाने जी बारा शिवालये बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे, असे मानले जाते. कोटेश्वर मंदिरात शिवपिंडी तर आहेच; पण गाभाऱ्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिषट्यपूर्ण शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. मुली स्कर्ट नेसतात तशीच रचना त्याच्या वस्त्राची दिसते. ही वेशभूषा पाश्चात्त्य वाटते. तुंदिलतनू असलेला हा गणेश उभा आहे. तो चतुर्भुज असून त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये परशू दिसतो; तर वरच्या डाव्या हातामध्ये बहुधा एखादे फळ असावे, कारण गणपतीची सोंड त्या फळावर टेकलेली आहे. छोटेखानी असलेली ही गणेश मूर्ती त्याच्या वस्त्रामुळे निश्चितच वेगळी ठरलेली आहे.

किल्ल्यावर संपादन

किल्ल्यावर ९व्या शतकात खोदलेल्या गुहा आहेत. तेथे एक गुहेत शंकराचे देऊळ आहे व दुसऱ्या गुहेत देविचे मंदिर आहे . गुहेकडे जाऊन आल्यावर परत डाविकडील रस्ता वर किल्लकडे जातो.जाताना प्रथम दोन पाण्याची टाकी लागतात. तेथून थोडे अंतर पुढे गेल्यावर पिंडीचे अवशेष पहायला मिळतात.त्या शेजारील बुरुजांचे पडलेले अवशेष पहायला मिळतात.तेथुन पायरृयची वाट खाली उतरताना दिसते तेथे उतरल्यावर डाव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प पाहव्यास मिळते.व मारूती मंदिर गुफा पाहव्यस मिळते. अनेक नैसर्गिक धबधबे दिसतात. नैसर्गिक पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.

इतिहास संपादन

छायाचित्रे संपादन

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे संपादन

गडावर गडपणाचे तुरळक अवशेष आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत.

==गडावरील खाण्याची सोय== गडावर खाण्याची सोय नाही आहे खाण्याची सोय स्वतः करावी

गडावरील पाण्याची सोय संपादन

गडावर जाण्याच्या वाटा संपादन

मार्ग संपादन

Mumbai-dadar-sion-panvel-khopoli-lonavala-talegaon-chakan-rajgurunagar(khed)-vada-dehane-shirgaon-tokavade-bhomale-bhorgiri(fort).

Mumbai-pune express highway kalamboli-talegaon toll naka(left turn)-chakan-rajgurunagar-vada-dehane-shirgaon-tokavade-bhomale-bhorgiri(fort).

New road: Talegaon-ghotavadi-dhamangaon-bhomale-bhorgiri(fort) Check on Google map

जाण्यासाठी लागणारा वेळ 30 मिनिट संपादन

संदर्भ संपादन

हे सुद्धा पहा संपादन