भारतातील ट्रॅम
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील ट्रॅमची स्थापना झाली. १८७३ मध्ये कोलकाता येथे घोड्यांनी ओढलेली ट्रॅम सुरू झाली; १८९५ मध्ये चेन्नईमध्ये विद्युत ट्रॅमची सुरुवात झाली आणि मुंबई, कानपूर आणि दिल्लीमध्येही ट्रॅमची सुरुवात झाली. कोलकाता वगळता १९३३ ते १९६४ दरम्यान सर्व भारतीय शहरांमध्ये ट्रॅम बंद करण्यात आल्या.[१]
कोलकाता
संपादनपश्चिम बंगालमधील कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) येथे कोलकत्ता ट्रॅमवेज कंपनी (सीटीसी) ही ट्रॅम चालवीत आहे. हे भारतातील एकमेव सक्रिय ट्रॅम जालव्यूह आहे [२] इथली ट्रॅम ही आशियातील सर्वात जुनी सक्रिय विद्युतचलित ट्रॅम असून हे १९०२ पासून कार्यरत आहे.[३] येथे एकूण २५७ ट्रॅम-गाड्या आहेत आणि त्यापैकी १२५ कोलकाताच्या रस्त्यांवर रोज चालत असत, परंतु आता दररोज केवळ ३५ ट्रॅ्म्स चालतात.[४] एक-मजली ट्रॅमगाडी २०० प्रवासी (पैकी ६० बसलेले) वाहून नेऊ शकते.
भारतातील प्रथम घोड्यांनी ओढलेली ट्रॅम सियालदाह आणि आर्मीनियाई घाट स्ट्रीट दरम्यान २४ फेब्रुवारी १८७३ रोजी २.४-मैल (३.९ किमी) अंतर धावली. ही सेवा त्या वर्षाच्या २० नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आली. २२ डिसेंबर १८८० रोजी लंडनमध्ये कलकत्ता ट्रॅमवे कंपनीची स्थापना व नोंदणी केली गेली. सियालदाहपासून बोबाजार मार्ग, डलहौसी चौक आणि स्ट्रँड रोड मार्गे अर्मेनियन घाटापर्यंत मीटर-गेज घोड्यांनी ओढलेल्या ट्रॅमचे रूळ बसविण्यात आले. या मार्गाचे उद्घाटन व्हाईसरॉय रिपन यांनी १ नोव्हेंबर १८८० रोजी केले. १८८२ मध्ये वाफ लोहयंत्र प्रायोगिकरित्या ट्रॅम गाड्यांकरिता तैनात करण्यात आले. १९व्या शतकाच्या अखेरीस कंपनीकडे १६६ ट्रॅमगाड्या, १,००० घोडे, सात बाष्प इंजिने आणि १ मैल लांबीचे(?) ट्रामचे रूळ होते. १९०० मध्ये, ट्रामवेचे विद्युतीकरण आणि त्यावरील ट्रॅकची पुनर्रचना ४ फूट ८ इंच रुंदीच्या रुळांमध्ये करण्याची सुरुवात झाली. १९०२ मध्ये, भारतातील पहिली विद्युत ट्रॅम २७ मार्च रोजी एस्प्लानेड ते किडरपोर आणि १४ जून रोजी एस्प्लानेड ते कालिघाटपर्यंत धावली.
मुंबई
संपादन१८६५ मध्ये एका अमेरिकन कंपनीने मुंबईसाठी (तत्कालीन बॉम्बे) एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रस्तावित केली होती, ज्यात घोड्याने ओढलेली ट्रॅम प्रणाली चालविण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. परवाना मंजूर झाला असला तरी, शहराच्या आर्थिक मंदीमुळे हा प्रकल्प कधीच साकार झाला नाही.
बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना १८७३ मध्ये झाली. बॉम्बे ट्रॅमवे कंपनी, नगरपालिका आणि स्टिअरन्स अँड किटरेज कंपनी यांच्यात करार झाल्यानंतर, बॉम्बे प्रेसिडन्सीने बॉम्बे ट्रामवे अधिनियमानुसार, १८७४ साली शहरात घोड्याने ओढलेली ट्रॅम सेवा चालविण्यास परवानगी दिली.[५] ९ मे, १८७४. रोजी, प्रथम घोड्यांनी ओढलेल्या गाडीने शहरातील पदार्पण करून कोलाबा - पायधुनी मार्गे क्रॉफर्ड मार्केट व बोरी बंदर ते पायधुनी मार्गे काळबादेवी मार्ग धावली. सुरुवातीचे भाडे तीन आणा (१५ पैसे) होते, आणि तिकिटे दिली जायची नाही. ही सेवा जसजशी लोकप्रिय होत गेली तसतसे भाडे दोन आणे (१० पैसे) पर्यंत कमी केले गेले. त्या वर्षाच्या शेवटी वाढत्या तिकीट नसलेल्या प्रवाश्यांना रोखण्यासाठी तिकिटे देणे सुरू केले.[६] सेवेच्या संपूर्ण कार्यकाळात स्टिअरन्स अँड किटरेजकडे १३६० घोडे होते.[७]
१८९९ मध्ये बॉम्बे ट्रॅमवे कंपनीने नगरपालिकेकडे विद्युत ट्रॅम चालविण्यासाठी अर्ज केला. १९०४ मध्ये ब्रश इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग कंपनीकडे ब्रिटिश इलेक्ट्रिक ट्रॅक्शन कंपनीने शहराला वीज पुरवठा करण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला. बॉम्बे इलेक्ट्रिक लायसन्सवर (परवाना) ३१ जुलै १९०५ रोजी, बॉम्बे ट्रॅमवेज कंपनी, बॉम्बे नगरपालिका आणि ब्रश इलेक्ट्रिकल कंपनीच्या स्वाक्षरीने प्राप्त झाला. १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रॅमवे कंपनी (बेस्ट)ची स्थापना झाली. शहरातील विद्युत पुरवठा आणि इलेक्ट्रिक ट्रॅम सेवा यावर बेस्टला मक्तेदारी मिळाली आणि बॉम्बे ट्रॅमवे कंपनीची मालमत्ता बेस्टने ₹९८,५०,००० देऊन विकत घेतली.[८] दोन वर्षांनंतर शहरात पहिली विद्युत ट्रॅम दाखल झाली. त्यावर्षी नंतर, एक ४,३०० किलोwatt (५,८०० hp) वारी बंदर येथे स्टीम पॉवर जनरेटर चालू करण्यात आला. १९१६ In मध्ये टाटा पॉवर (खासगी कंपनी) कडून वीज खरेदी सुरू झाली आणि १९२५ पर्यंत टाटाकडे सर्व वीजनिर्मिती सोपविण्यात आली.[९] गर्दीच्या वेळी रहदारी सुलभ करण्यासाठी, डबल-डेकर ट्रॅम सप्टेंबर, १९२० मध्ये दाखल करण्यात आले. शहराच्या रेल्वे जालव्यूहाची उन्नती होईपर्यंत ट्रॅमने प्रवाशांच्या गरजा भागविल्या आणि ३१ मार्च, १९६४ रोजी ही सेवा बंद झाली.[१०]
नाशिक
संपादन१८८९ मध्ये नाशिक मध्ये २ फूट ६ इंचाची अरुंदमापी ट्रॅम बांधण्यात आली. सल्लागार अभियंता एव्हरार्ड कॅलथ्रोप होते, नंतर ती बार्शी लाईट रेल्वे म्हणून ओळखली गेली. मूलतः, ट्रॅममध्ये चार घोडे खेचलेल्या दोन गाड्या वापरल्या जात. ही ट्रॅम मुख्य रस्त्यावरील जुन्या महानगरपालिकेच्या विद्यमान इमारतीपासून ते नाशिक रोड रेल्वे स्थानकापर्यंत ८ ते १० कि.मी. अंतरावर धावायची. नाशिक ते नाशिक रोड दरम्यानचा भाग जंगलाने व्यापलेला होता आणि स्थानकातून शहराकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे घोडागाडी किंवा टॅक्सीपैकी एक. १९३१ ते १९३३ दरम्यान ट्रॅमची सेवा थांबविण्यात आली.
चेन्नई
संपादनचेन्नईमधील (आधीचे मद्रास) ट्रॅम गोदी व अंतःक्षेत्रीय भागात माल आणि प्रवासी घेऊन चालत असे. जेव्हा ७ मे१८९५ रोजी ही प्रणाली सुरू झाली, तेव्हा ही भारतातील सर्वात जुनी विद्युत ट्राम प्रणाली होती. मूळ नाली प्रणाली विनाशकारी मान्सूनच्या मालिकेनंतर पारंपारिक उपरि तारेत बदलली गेली. ट्रॅम मोठ्या प्रमाणात भार वाहून न्यायची आणि दररोज हजारो स्वारांसह लोकप्रिय होते. मार्गात माउंट रोड, पॅरी कॉर्नर, पूनमल्ली मार्ग आणि रिपन बिल्डिंगचा समावेश होता .१९२१ मध्ये चेन्नई ट्रॅम प्रणालीत, ९७ गाड्या २४ किलोमीटर (१५ मैल) रुळांवर धावायचा. ट्रॅम कंपनी सुमारे १९५० मध्ये दिवाळखोरी झाली आणि ही प्रणाली १२ एप्रिल १९५३ रोजी बंद झाली.[१०]
कानपूर
संपादनजून १९०७. मध्ये कानपूर (तत्कालीन कॉनपोर Cannapore) मध्ये ट्रॅमसेवेची सुरुवात झाली. येथे ४ मैल (६.४ किमी) लांबीचे रूळ आणि २० एक मजली उघड्या ट्रॅम धावायचा. एका रुळाच्या मार्गिकेने रेल्वेस्थानक गंगेच्या काठावरील सिरसाया घाटाशी जोडले होते. कानपूर ट्रॅमची छायाचित्रे दुर्मिळ आहेत. प्रास्ताविक गाड्या विद्युत-कर्षण एकल-कोचच्या होत्या; दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे एकल-कोच ट्राम वापरण्यात आले. ही सेवा [१०] १६ मे, १९३३ रोजी बंद करण्यात आली.[१०]
केरळ
संपादनकोचीन स्टेट फॉरेस्ट ट्रॅमवे एक १००० मिलिमीटरमापी होती.[११][१२][१३] पलकक्कड जिल्ह्यातील परंबीकुलम वन्यजीव अभयारण्य ते त्रिशूर जिल्ह्यातील चालकुडीपर्यंत वनातून चालणारे ट्रॅमवे होता.. १९०७ ते १९६३ या काळात ती कोचीन राज्यात (आता केरळचा भाग) चालू होती आणि जागतिक नौभारण्यासाठी जंगलातून सागवान आणि शीशम वाहून आणत असत.[१२][१३]
दिल्ली
संपादन६ मार्च, १९०८ रोजी दिल्लीतील ट्रॅमची सेवा सुरू झाली. १९२१ मध्ये दिल्लीत २४ उघड्या गाड्या १५ किलोमीटर (९.३ मैल) लांबीच्या रुळांवर धावत असत. जमा मस्जिद , चांदणी चौक, चावरी बाजार, कटरा बडिया, लाल कुआ आणि फतेहपुर हे स्थानके, सब्जी मंडी, सदर बाजार, पहाडगंज, अजमेरी गेट, बडा हिंदू राव आणि तीस हजारीला जोडले होते. शहरी दाटी वाढल्यामुळे १९६३मध्ये ही सेवा बंद झाली.
पाटणा
संपादनपाटण्यामध्ये घोड्याने ओढलेल्या ट्रॅम शहरी वाहतूक म्हणून वापरात होत्या.[१४] पाटणा ट्रॅम, अशोक राजपथच्या प्रसिद्ध परिसरात पाटणा शहरापासून बांकीपूरपर्यंत धावत असत, आणि साजिबाग (पीरबाहोर पोलीस ठाण्याच्या पलीकडे) हे या मार्गिकेचे पश्चिमेकडील अंत्य स्थानक होते. कमी वापरकर्त्यांमुळे १९०३ मध्ये ही ट्रॅमसेवा बंद केली गेली आणि पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गाचा विस्तार कधीही पूर्ण होऊ शकला नव्हता.
भावनगर
संपादनभावनगरला भावनगर सरकारची २ फूट ६ इंची अरुंदमापी ट्रॅमसेवा होती. पहिला भाग १९२६ मध्ये भावनगर-दक्षिणकडून तळाजापर्यंत बांधला गेला होता आणि १९३८मध्ये तो महुवापर्यंत वाढविण्यात आला होता. ट्रॅममार्गाची एकूण लांबी ६७.५ मैल (१०८.६ किमी) .या गाड्या लहान ४-८-० टी क्लास गतियंत्र वापरायच्या. १९४७ मध्ये, हा ट्रॅममार्ग सौराष्ट्र रेल्वेने आणि नंतर पश्चिम रेल्वेने ताब्यात घेतला.[१५] १९६० च्या दशकात ही सेवा बंद करण्यात आली .
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Smith, R.V. "When trams plied". The Hindu.
- ^ "Reaching India". New Delhi: Times Internet Limited. 2019-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 February 2012 रोजी पाहिले.
- ^ "Kolkata trams to get a GenX makeover". 13 July 2012. 2013-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-06 रोजी पाहिले.
- ^ "Bankrupt CTC to introduce two more AC trams". द टाइम्स ऑफ इंडिया. 14 August 2013. 2013-08-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-06 रोजी पाहिले.
- ^ "Growth of Mumbai & its Municipal Corporation". Quarterly journal of the Local Self Government Institute (Mumbai). 1976. p. 13.
- ^ David, M. D. (1995). Mumbai, the city of dreams: a history of the first city in India. Himalaya Publishing House. pp. 199–200.
- ^ Aklekar, Rajendra B (2014). Halt station India : the dramatic tale of the nation's first rail lines. Rupa & Co. p. 193. ISBN 9788129134974. 23 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "Electricity Arrives in Mumbai". BEST Undertaking. 11 October 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 October 2006 रोजी पाहिले.
- ^ "Electricity Arrives in Mumbai". BEST Undertaking. 8 October 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 October 2006 रोजी पाहिले.
- ^ a b c d Tram views of Asia Archived 2017-01-13 at the Wayback Machine. Retrieved 2011-03-16.
- ^ Journal on the Cochin State Forest Tramway
- ^ a b "Tramway to a trade empire". The Hindu. 2010-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-17 रोजी पाहिले.
- ^ a b "Public to get glimpses of the marvel of erstwhile tramway". The New Indian Express. 2014-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-17 रोजी पाहिले.
- ^ "First-ever book on Patna soon". The Times of India, September 23, 2008 Archived 2012-10-21 at the Wayback Machine. Retrieved 2011-03-16.
- ^ Hughes, Hugh 1994 Indian Locomotives Pt. 3, Narrow Gauge 1863-1940. Continental Railway Circle.