लक्ष्मण बापुजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर हे मराठी रंगभूमीवरचे गायकनट होते. त्यांचा जन्म बडोदा येथे ९ मार्च १८६३ला झाला होता. फारसे न शिकलेले भाऊराव, बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नोकरीला होते. मात्र साधे कारकून असलेल्या भाऊरावाना, बडोद्यातील माणसे गायक म्हणून ओळखत.

जन्म लक्षमण बापुजी कोल्हटकर
मार्च ९, १८६३
बडोदे, बडोदे संस्थान, भारत
मृत्यू फेब्रुवारी १३, १९०१
पुणे, महाराष्ट्र
इतर नावे भावड्या
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटक
कारकीर्दीचा काळ इ.स.१८८२ ते इ.स.१९००
भाषा मराठी,
प्रमुख नाटके संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र, संगीत रामराज्यवियोग, संगीत शारदा
वडील बापूबोवा
आई भागीरथीबाई

अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपल्या नाटकांत स्त्री-भूमिका करण्यासाठी सुंदर रूप आणि गोड आवाज असलेल्या भाऊरावांची निवड केली. भाऊरावांना अभिनयाचे तंत्र गोविंद बल्लाळ देवल यांनी शिकवले. इ.स. १८८२ ते १८८९पर्यंत भाऊराव कोल्हटकरांनी स्त्री भूमिका आणि त्यानंतर १९००पर्यंत सुभद्रेचा अपवाद वगळता, मुखत्वे पुरुष भूमिका केल्या.

त्यांच्या गाजलेल्या भूमिका
--

अप्रतिम अभिनयामुळे आणि गोड गळ्यामुळे भाऊराव कोल्हटकर यांच्या भूमिका लोकांना अतिशय आवडत. लोक त्यांना प्रेमाने भावड्या म्हणत. पुरुष भूमिका करताना त्यांच्या चढ्या, पल्लेदार आणि सुरेल आवाजामुळे भूमिकांना चांगला उठाव येई.

अण्णासाहेब किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर भाऊराव कोल्हटकर किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार झाले (इ.स.१८८५). त्यानंतर १६च वर्षांनी म्हणजे १३ फेब्रुवारी १९०१ रोजी भाऊराव यांचे पुणे मुक्कामी निधन झाले.

१७ मार्च १९०० रोजी पुण्याच्या आर्यभूषण थिएटरात झालेल्या शारदा नाटकातील कोदंडाची भूमिका त्यांची अखेरची ठरली. त्याच वर्षी मे महिन्यात ते आजारी पडले आणि परत बरे झालेच नाहीत.

चरित्र संपादन

"लक्ष्मण बापुजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र" हे पुस्तक कुणी अज्ञात लेखकाने लिहून १९०१ साली प्रकाशित केले आहे.