शारदा ही विद्येची देवता आहे. सरस्वतीला अनेक नावांबरोबर शारदा हे एक नाव असले तरी शारदा म्हणजे सरस्वती नाही. हंस किंवा मोर ही सरस्वतीची वाहने आहेत. शारदेला वाहन असल्याचे ज्ञात नाही.

मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्यात त्रिकूट पर्वतावर हिचे मंदिर आहे. शारदादेवीचे भारतातील हे एकुलते एक मंदिर असावे.

महाराष्ट्रात शारदेला गणपतीची पत्‍नी समजले जाते. त्यामुळे पुण्यातील मंडईतल्या गणेशोत्सवात गणपतीच्या जवळ बसलेली शारदा अशी मूर्ती असते.