बिलासपूर
भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर
(बिलासपुर या पानावरून पुनर्निर्देशित)
बिलासपूर हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील बिलासपूर जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. राजधानी रायपूरच्या १३३ किमी उत्तरेस वसलेले बिलासपूर छत्तीसगढमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.३१ लाख इतकी होती. हिंदीसोबत येथे छत्तीसगढी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
बिलासपूर | |
भारतामधील शहर | |
बिलासपूर रेल्वे स्थानक |
|
देश | भारत |
राज्य | छत्तीसगढ |
जिल्हा | बिलासपूर जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ८६० फूट (२६० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ३,३१,०३० |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
वाहतूक
संपादनभारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय बिलासपूर येथेच असून हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावर असलेले बिलासपूर रेल्वे स्थानक देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
बिलासपूर विमानतळ या शहरास विमानसेवा पुरवतो.
बाह्य दुवे
संपादन- छत्तीसगढ शासनाचे संकेतस्थळ Archived 2017-06-11 at the Wayback Machine.
- छतीसगढ पर्यटन मंडळाचे संकेतस्थळ Archived 2016-11-13 at the Wayback Machine.