बाळकृष्ण इंडस्ट्रीज

बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड ( बीकेटी ) ही मुंबई, भारत येथील टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. बाळकृष्ण इंडस्ट्रीज विशेष विभागांत वापरले जाणारे टायर बनवतात उदा खाणीत काम करणारी वाहने, जमीन खोदणारी यंत्रे, शेती आणि बागकाम. या कंपनीचे पाच कारखाने औरंगाबाद, भिवंडी, चोपांकी, डोंबिवली आणि भूज येथे आहेत. स.न. २०१३ मध्ये, जगातील टायर उत्पादकांमध्ये हे ४१ व्या स्थानावर होते. []

बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नाव बी.एस.ई.502355
एन.एस.ई.BALKRISIND
उद्योग क्षेत्र Auto and Truck parts
स्थापना १९८७ []
मुख्यालय मुंबई, भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
उत्पादने टायर्स
महसूली उत्पन्न increase 37.8 अब्ज (US$८३९.१६ दशलक्ष) (२०१६ - १७) []
निव्वळ उत्पन्न increase 10.59 अब्ज (US$२३५.१ दशलक्ष) (२०१६ - १७) []
कर्मचारी ६,०००
संकेतस्थळ www.bkt-tires.com

बाळकृष्ण इंडस्ट्रीज सध्या जेसीबी, जॉन डीरे आणि सीएनएच इंडस्ट्रियलसारख्या अवजड उपकरण उत्पादकांसाठी एक OEM विक्रेता आहे. या कंपनीचा सध्या ग्लोबल ऑफ-द-रोड टायर सेगमेंटमध्ये २% मार्केट शेअर आहे. []

बाळकृष्ण इंडस्ट्रीज मुख्यत: उत्तर अमेरिका आणि युरोपमधील बदली बाजारात आहे. त्यांचे उत्तर अमेरिकन कार्यालय अक्रॉन येथे आहे. व्हेन्डो, दक्षिण कॅरोलिना येथे एक गोदाम आहे. [] अमेरिकेतील बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा जवळपास ८५ टक्के व्यवसाय शेतीशी निगडीत आहे. []

बीकेटी टायर्स २०१४ पासून मॉन्स्टर जॅमसाठी अधिकृत आणि विशेष टायर प्रायोजक आहेत. [] जुलै २०१८ मध्ये, बीकेटीने करारानुसार लीगला सेरी बीकेटी म्हणून ओळखले जाणारे तीन वर्षांसाठी इटालियन फुटबॉलच्या दुसऱ्या विभागातील सेरी बीचे नामकरण अधिकार खरेदी केले. []

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.bkt-tires.com/en/about-us/corporate-profile
  2. ^ "Archived copy" (PDF). 2 October 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2 October 2017 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  3. ^ "Archived copy" (PDF). 2 October 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2 October 2017 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  4. ^ Staff, Tire Business. "BKT opens 1st U.S. warehouse - Tire Business". Tire Business. 24 January 2018 रोजी पाहिले.
  5. ^ Shyam, Ashutosh R. (10 April 2014). "What makes Balkrishna Industries confident of achieving higher market share amid competition from Michelin, Bridgestone and Continental?". The Economic Times. 24 January 2018 रोजी पाहिले.
  6. ^ "BKT investing in infrastructure, staff in North America". Tyrepress (इंग्रजी भाषेत). 17 December 2014. 24 January 2018 रोजी पाहिले.
  7. ^ McCarron, Kathy. "Tire veteran Casalbore ready for challenge at BKT USA - Rubber & Plastics News". Rubber & Plastics News. 24 January 2018 रोजी पाहिले.
  8. ^ "BKT the official tyre of Monster Jam". Tyrepress (इंग्रजी भाषेत). 4 March 2014. 24 January 2018 रोजी पाहिले.
  9. ^ http://www.calcioefinanza.it/2018/06/22/nuovo-title-sponsor-serie-b-bkt/