ज्योतिर्लिंग
शिवाचे प्रतिक असलेली काही मोजकी लिंगे
(बारा ज्योतिर्लिंगे या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :
शिवाचे प्रतिक असलेली काही मोजकी लिंगे | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | deity | ||
---|---|---|---|
उपवर्ग | aspect of Shiva | ||
| |||
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
हिंदू धर्मानुसार अस म्हणल जात की जी व्यक्ति "वरील बारा ज्योर्तिलिंगाचे नावानुरूप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्मातील झालेला पाप ज्योर्तिलिंगाच्या स्मरणामुळे / जप केल्यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.
- सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
- मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
- महाकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
- ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
- वैजनाथ (महाराष्ट्र - परळी, बीड जिल्हा) - उत्तर भारतात झारखंड मधील देवघर स्थित वैद्यनाथ देवस्थानास वैजनाथ ज्योतिर्लिंग मानतात.
- भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
- रामेश्वर (तामिळनाडू - रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
- नागनाथ हिंगोली, (महाराष्ट्र) - उत्तर भारतात गुजरातच्या द्वारकेतील नागेश्वर देवस्थानास नागनाथ ज्योतिर्लिंग मानतात.
- विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
- त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर तालुका ,नाशिक जिल्हा)
- केदारनाथ (उत्तराखंड - केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
- घृष्णेश्वर मंदिर (महाराष्ट्र -वेरुळ, खुलताबाद तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा).
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |