बर्बर लोक
बर्बर लोक (बर्बर भाषा:ⵉⵎⴰⵣⵉⵗⴻⵏ;इमाझियें)हे उत्तर आफ्रिकेत राहणारी जमात आहे. हे लोक मुख्यत्वे अल्जिरीया, मॉरिटानिया, उत्तर माली, मोरोक्को, ट्युनिसिया, उत्तर नायजर, लिब्या आणि इजिप्तच्या पश्चिम भागात राहतात. हा प्रदेश साधारण पश्चिमेस अटलांटिक महासागरापासून इजिप्तमधील सिवा रणद्वीपापर्यंत आणि उत्तरेस भूमध्य समुद्रापासून नायजर नदीपर्यंत पसरलेला आहे.
ही लोक बर्बर भाषा बोलत असत. इ.स.च्या ७व्या शतकात आफ्रिकेत इस्लामचा प्रसार झाल्यावर बर्बरांनी जेत्यांच्या भाषा वापरल्या. फ्रांसने हा प्रदेश जिंकल्यावर फ्रेंच भाषा सक्तीची केली व बर्बरांनी ही भाषा अंगिकारली.
बव्हंश बर्बर सुन्नी मुस्लिम असले तरी इतर धर्मीय बर्बरही आढळतात.