सुन्नी इस्लाम
(सुन्नी मुस्लिम या पानावरून पुनर्निर्देशित)
सुन्नी हा इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. एहल् अस्-सुन्ना वअल्-जमाआ (अरबी: أهل السنة والجماعة "(मुहम्मदाच्या) परंपरेतील समाज") किंवा एहल् अस्-सुन्ना (अरबी: أهل السنة) या नावांनीही हा ओळखला जातो.. सुन्नी पंथात आचार, कायदा इत्यादींविषयी तत्त्वप्रणाली मांडणाऱ्या 'मजहब' नावाने उल्लेखल्या जाणाऱ्या चार परंपरा किंवा 'मार्ग' आहेत : हनाफी मार्ग, मालिकी मार्ग, शफीई मार्ग, हनबाली मार्ग.