बर्नी सँडर्स

अमेरिकन राजकारणी

बर्नार्ड सॅंडर्स (इंग्लिश: Bernard "Bernie" Sanders, ८ सप्टेंबर १९४१) हे एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सेनेटर आहेत. २००७ सालापासून सेनेटर असलेले सॅंडर्स १९९१ ते २००७ दरम्यान अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहाचे सदस्य होते. अमेरिकन काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ अपक्ष राहिलेल्या सॅंडर्सनी २०१५ साली डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. स्वतःला लोकशाहीवादी समाजवादी मानणाऱ्या सॅंडर्सनी मजूर वर्गाच्या हक्कांसाठी लढा दिला आहे तसेच समाजातील आर्थिक असमानतेबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यांची धोरणे व विचार प्रामुख्याने युरोपातील सोशालिस्ट पुढाऱ्यांच्या मतांसोबत मिळतीजुळती आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबद्दल नापसंदी व्यक्त करणाऱ्या सॅंडर्सनी पहिल्यापासूनच इराक युद्धाला विरोध केला आहे.

बर्नी सॅंडर्स
Bernie Sanders

विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी, २००७
पॅट्रिक लेहीच्या समेत

कार्यकाळ
३ जानेवारी, १९९१ – ३ जानेवारी, २००७

जन्म ८ सप्टेंबर, १९४१ (1941-09-08) (वय: ८३)
ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष १९७९-२०१५: अपक्ष
२०१५-चालू: डेमोक्रॅटिक
निवास बर्लिंग्टन, व्हरमॉंट
सही बर्नी सँडर्सयांची सही

एप्रिल २०१५ मध्ये सॅंडर्सनी २०१६ डेमॉक्रॅटिक पक्ष प्राथमिक निवडणूकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. २३ राज्यांमधील प्राथमिक निवडणुका जिंकून देखील त्यांना पुरेशी मते मिळवण्यात अपयश आले. हिलरी क्लिंटन ही डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार म्हणून नोव्हेंबर २०१६ मध्ये अध्यक्षीय निवडणूक लढवेल.

बाह्य दुवे

संपादन