प्राण्याच्या बहुतेक रोगांना माणसांना होणाऱ्या रोगांचीच नावे आहेत. त्यावर ॲलोपॅथी औषधोपचार पद्धतीत औषधेही जवळपास सारखी असतात. फरक फक्त इतकाच आहे कि प्राण्यांच्या वजनाचे अनुपातात, व भव्यतेनुसार औषधाची मात्रा (डोज) ही सुमारे आठपट इतकी असते.त्यास इंग्रजीत व्हेटर्नरी डोज असे म्हणतात.प्राण्यांसाठी वापरली जाणारी इंजेक्शने ही, हा वाढीव डोज सामावण्यालायक असतात व त्यांच्या सुयाही तितक्याच जाड असतात कारण त्यांना प्राण्यांची निबर व जाड कातडी भेदावी लागते.[ संदर्भ हवा ]

दुधाळु जनावरे

संपादन

दुधाळु जनावरे म्हणजे ज्या जनावरांचे दूध काढता येते अशी जनावरे होय.ही सहसा पाळीवच असतात.त्यांना काही रोग झाल्यास अथवा रोगामुळे एखादे जनावर दगावल्यास दुधाचे उत्पन्नावर परिणाम होतो व त्याने जनावराच्या मालकाचे आर्थिक नुकसानही होते. रोगामुळे दुधाची प्रतवारीही घसरते.सहसा गाय, म्हैस, उंट, बकरी,मेंढी ही पाळीव दुधाळू जनावरे असतात.

दुधाळु जनावरांचे रोग

संपादन

दुधाळु जनावरांना होणारे मुख्य रोग खालील प्रमाणे आहेत: