आंत्रिविषार हा विशेषतः शेळ्या मेंढ्या इत्यादी वर्गातील जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा रोग 'क्लॉस्ट्रीडियम परफिन्जीस (प्रकार-डी)' या विषाणूंमुळे होतो.हा महाभयंकर रोगात गणल्या जातो.

या रोगाचे जंतू जमिनीत, जनावराच्या आतड्यात वास्तव्य करून असतात.दूषित खाद्य किंवा/व दूषित पाण्याद्वारे या रोगाचे संक्रमण होते.याचे जंतू पोटात जाऊन जनावराचे आतड्यात एक प्रकारचे विष निर्माण करतात.त्याने हा रोग फैलावतो.

लक्षणे

संपादन

असे हे आतड्यात तयार झालेले विष मग संपूर्ण शरीरात पसरते.या विषबाधेमुळे चरावयास गेलेल्या मेंढ्या/शेळ्या अचानक मलूल व सुस्त होतात. त्यांना पातळ हागवण लागते.क्वचित आतड्याच्या दाहामुळे रक्तमिश्रित हगवण पण होते.याचे प्रमाण वाढल्यास व विष शरीरात भिनल्यामुले त्या तडकाफडकी दगावतात.या रोगामुले मेंढ्यांना नीट उभे राहता येत नाही. त्यांचे डोळे ताणल्या जातात.त्यांचे पोटात सारख्या कळा येतात त्यामुळे त्या सतत पाय झाडतात व बेशुद्धही पडतात.

मेंढ्यांची ४ ते ६ आठवडे वयाची पिल्ले यांना बाधा लवकर होते व ती लवकर मृत्युमुखी पडतात.

प्रतिबंधक उपाय

संपादन

पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रोगाची प्रतिबंधक लस जनावरांना टोचून घ्यावी

हेही बघा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन