धनुर्वात हा सस्तन प्राण्यांना होणारा एक रोग आहे.हा मानव अथवा प्राणी यापैकी कोणासही होऊ शकतो.हा एक जीवाणूजन्य रोग आहे.या रोगाचा प्रादुर्भाव 'क्लोस्टिडियम टिटॅनस' या जंतूंमुळे होतो.हा रोग घोड्यामध्येही आढळून येतो.या रोगात पाठ धनुष्यासारखी कमानदार होते म्हणून या रोगास 'धनुर्वात' हे नाव पडले आहे.

इतर नावे

संपादन

या रोगाचे जीवाणू मानवाच्या अगर प्राण्यांच्या विष्ठेत आढळतात.जनावरांच्या टापांना,खुरांना अगर अंगावर खिळे, तार, काटे इत्यादीमुळे जखमा झाल्यावर त्याची वेळीच योग्य काळजी न घेतल्यास हा रोग होतो.

लक्षणे

संपादन

घोडा असेल तर त्याची शेपुट,कान व मान ताठ होते.घोड्यास जबडा उघडता येत नाही.त्याची दातखिळी बसते व त्याला श्वासोच्छवास करता येत नाही. शेळ्या, मेंढ्या किंवा इतर गुरांना याची लागण झाल्यास त्यांचे पोट फुगते.पाय व मान ताठ होतात व पाठीच्या कण्याला खड्डा पडलेला आढळतो म्हणजेच वाक येतो.

औषधोपचार

संपादन

जखम निर्जंतुक करावी व त्यावर निर्जंतुक करणारे मलम इत्यादी लावावे.प्रतिजैविकाची व टिटॅनस टॉक्साईड आदी इंजेक्शने पशुवैद्यक डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावी.

प्रतिबंधक उपाय

संपादन

जनावरांची योग्य देखभाल करणे व त्यांना जखम/जखमा झाल्यावर ताबडतोब ती निर्जंतुक करणे.पशुवैद्यक डॉक्टरांच्या सल्ल्याने रोग होऊ नये म्हणून खबरदारीची उपाययोजना म्हणून टिटॅनस टॉक्साईडचे इंजेक्शन देणे.

हेही बघा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन