फाशी (पशुरोग)
फाशी हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे. या रोगाने ग्रस्त जनावरे, काही रोगलक्षणे दिसण्यापूर्वीच, अचानक जमिनीवर पडतात व पाय झाडत-झाडत मरतात.फाशी दिलेले गुन्हेगार ज्याप्रमाणे प्राणवायूच्या अभावी पाय झाडत मरतात, तशी अवस्था जनावरांची होत असल्याप्रमाणे यास असे नाव पडले असण्याची शक्यता आहे. हा जनावरांचा एक प्राणघातक असा रोग आहे.या रोगास इंग्लिश भाषेत 'ॲथ्रॅंक्स'(इं.-Anthrax) असे नाव आहे.हा रोग 'बॅसिलस ॲंथ्रासिस' या विषाणुंमुळे मानवात व प्राण्यात(सस्तन प्राण्यांत) उद्भवतो.
इतर नावे
संपादनभारताच्या ग्रामीण भागात याला काळपुरी,गोळी,पेळु,सुश्या,नरपडे, भामऱ्या,हुमंडा इत्यादी नावांनी ओळखले जाते.
लागण
संपादनया रोगाची लागण झालेली जनावरे/प्राणी यांचे मलमुत्रातुन,नाकाडोळ्यातून वाहणाऱ्या लाळ, रक्त व पाण्याद्वारे फैलणाऱ्या संसर्गामुळे, तसेच पिण्याच्या पाण्याचे भांडे, हौद, कुरणातील गवत इत्यादींमुळेही या रोगाचा प्रसार होतो.प्राण्यांना झालेल्या जखमांद्वारे हे विषाणू त्याचे शरीरात प्रवेश करतात व त्यायोगे त्यांची वाढ झाल्यावर या रोगाची लक्षणे दिसतात.
लक्षणे
संपादनजनावरांना/प्राण्यांना ताप येणे,शरीरास थरथर सुटणे,पोटशुळ, पोटफुगी तसेच तोंड , नाक व गुदद्वारातून रक्तस्त्राव ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत.हा रोग झालेल्या जनावरांचे/प्राण्यांचे रक्त गोठत नाही व त्या रक्ताचा रंग डांबरासारखा काळसर असतो.
औषधोपचार
संपादनआजारी प्राण्यास वेगळे बांधून या रोगावर प्रतिजैविक औषधांचा मारा करण्यात येतो.यात बहुदा पेनिसिलिन स्ट्रेप्टोपेनिसिलिन आदी औषधांचा समावेश असतो.
प्रतिबंध
संपादनयासाठी प्रतिबंधक लस उपलब्ध असते. ती गुरांना टोचून घ्यावी.
हेही बघा
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |