मेंढी
मेंढी हा एक चतुष्पाद पाळीव प्राणी आहे. हा मुळात युरोप व आशिया या खंडांचा रहिवासी आहे. मेंढ्यांच्या अंगावर केसाळ कातडी असते. ते केस म्हणजेच लोकर. मेंढीची लोकर हे मेंढीपासून मिळणारे महत्त्वाचे उत्पादन आहे. त्यासाठी मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय केला जातो. मेंढ्यांचे मांसही खाल्ले जाते. पुण्याजवळील काही भागात मेंढीच्या मटणाला बोल्हाईचे मटण असे सुद्धा म्हणतात. वाडेबोल्हाई या गावातील बोल्हाई देवीवरून हे प्रचलित झाले. मेंढपाळ मेंढीचे दूध पिण्यासाठी उपयोगात आणतात.
सध्या ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मेंढ्या पाळल्या जातात.
इतिहास
संपादनमेंढी हा मानवाच्या इतिहासातला सर्वात आधी पाळला गेलेला प्राणी आहे. याची सुरुवात सुमारे नऊ ते अकरा हजार वर्षांपूर्वी झाली असावी असा एक अंदाज आहे.
इतिहास - आफ्रिका
संपादनयुरोपातून मेंढी आफ्रिका खंडात आली असे मानणारा एक प्रवाह आहे.
इतिहास - युरोप
संपादनइतिहास - उत्तर अमेरिका
संपादनइतिहास - दक्षिण अमेरिका
संपादनइतिहास - ऑस्ट्रेलिया
संपादनयुरोपातून तसेच बांगलादेशातून येथे उत्तम प्रतीची मेंढी आणण्यात आली. ऑस्ट्रेलियात सगळ्यात जास्त मेंढी पालन केले जाते. ऑस्ट्रेलियातील वातावरण मेंढी पाळण्यासाठी पूरक असल्याने तेथे मेंढी पालन हा मुख्य व्यवसाय आहे
वर्णन
संपादनकेसाळ व शिंगे असलेल्या मेंढीचे केवळ दिसण्यावरून अनेक प्रकार करता येतील.
आवाज
संपादनमेंढी में में असा आवाज काढते.
प्रजाती
संपादनभारतात मेंढ्यांच्या विविध ३९ जाती आढळतात. भारतीय मेंढ्यांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत.
- हिमालयीन पर्वतरांगांत (उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश) कर्नाह, काश्मिरी, गद्दी, गुरेझ,भाकरवाल, रामपूर-भुशियार या प्रमुख जाती आढळतात. कर्नाह व काश्मिरी या जाती उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
- भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागांत (उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा) कच्छी, काठेवाडी, चौकला, नाली, पाटणवाडी, मागरा, मारवाडी, लोही, सोनाडी, हिस्सार डेल या मेंढ्यांच्या जाती आढळतात.
- भारताच्या दक्षिण भागात (आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू) दख्खनी, नेल्लोर, बेल्लारी, मद्रासरेड, माडग्याळ, मेंचेरी या प्रमुख जाती आढळतात. यांपकी नेल्लोर, मद्रास रेड, माडग्याळ, मेंचेरी या मेंढ्यांच्या जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
- भारताच्या पूर्व (रिसा, पश्चिम बंगाल, बिहार) आणि ईशान्य भागात गंजाम, गरोल, छोटा नागपुरी, तिबेटल, शहाबादी या जाती आढळतात. गंजाम, छोटा नागपुरी, दख्खनी, बेल्लारी, मारवाडी, सोनाडी, शहाबादी या मेंढ्यांच्या जाती लोकर व मांस या दुहेरी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत.
- भारतात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळणारी बकरी हा पण मेंढीच्या जातीतला एक प्रकार आहे.
महाराष्ट्रातील जाती
संपादनमहाराष्ट्रात मेंढ्यांच्या दख्खनी व माडग्याळ या दोनच प्रमुख जाती आढळतात. दख्खनच्या पठारावर आढळत असल्याने दख्खनी मेंढी हे नाव पडले. संगमनेरी, लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी या दख्खनी मेंढींच्या चार उपजाती आहेत. दख्खनी मेंढी उष्ण हवामानात, कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात पाळण्यास उपयुक्त असून मांस व लोकर उत्पादनासाठी पाळतात. माडग्याळ मेंढय़ा सांगली जिल्ह्य़ातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, माडग्याळ व सिद्धनाथ या भागात जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच या मेंढ्यांना हे नाव पडले.
परदेशी जाती
संपादनमेंढ्यांच्या विदेशी जातींमध्ये मेरिनो, रॅमब्युलेट, चेव्हिओट, कॉरिडेल, डॉरसेट, साऊथ-डाऊन, पोलवर्थ, सफॉल्क विशेष प्रसिद्ध आहेत. मेरिनो मेंढीचे उगमस्थान स्पेन असून उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी ती जगप्रसिद्ध आहे. संकरीकरणाद्वारे स्थानिक मेंढ्यांचे लोकर उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी मेरिनो नरांचा विविध देशांत वापर केला जातो. सफॉल्क, डॉरसेट, साऊथ-डाऊन मेंढ्यांचे उगमस्थान इंग्लंड असून त्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
मेंढ्यांचे अन्न
संपादनमुख्यतः चारा तसेच झाडांची कोवळी पाने.
वागणूक व बुद्धिमत्ता
संपादनमेंढ्यांचे आरोग्य
संपादनमेंढ्याना होणारे रोग चटकन दिसून येत नाहीत. पण त्यांना संसर्गजन्य रोग होत असतात. आंत्रविषार हा रोग शेळी आणि मेंढी या दोन्ही प्रजाती मध्ये पावसाळ्यात होतो.
मेंढ्यांची संख्या चीन मध्ये सर्वाधिक आहे. त्या नंतर ऑस्ट्रेलिया व भारताचा तिसरा क्रमांक आहे. ऑस्ट्रेलिया मेंढ्यांची लोकर तसेच जिवंत मेंढ्याही मांसासाठी निर्यात करतो.
अन्न म्हणून महत्त्व
संपादनमेंढीचे मांस हे जगात खाल्ले जाणारे एक प्रमुख अन्न आहे.
संदर्भ व नोंदी
संपादन- Budiansky, Stephen. The Covenant of the Wild: Why animals chose domestication.
- Ensminger, Dr. M.E. Sheep and Goat Science, Fifth Edition. Danville, Illinois.
- Simmons, Paula. Storey's Guide to Raising Sheep. North Adams, MA.
- Smith M.S., Barbara. Beginning Shepherd's Manual, Second Edition. Ames, Iowa.
- Weaver, Sue. Sheep: small-scale sheep keeping for pleasure and profit. 3 Burroughs Irvine, CA 92618.CS1 maint: location (link)
- Wooster, Chuck. Living with Sheep: Everything You Need to Know to Raise Your Own Flock. Guilford, Connecticut.
बाह्य दुवे
संपादन- अमेरिकन शीप इंडस्ट्री
- ऑस्ट्रेलियन असोसिएशन ऑफ स्टड मरीनो ब्रीडर्स Archived 2008-12-08 at the Wayback Machine.
- कॅनेडियन शीप फेडरेशन Archived 2008-05-25 at the Wayback Machine.
- कोर्नेल युनिव्हर्सिटी शीप प्रोग्राम Archived 2008-09-17 at the Wayback Machine.
- डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्री - शीप Archived 2008-10-07 at the Wayback Machine.
- नॅशनल शीप असोशिएशन (यु.के.)
- न्यू झीलंड शीप ब्रीडर्स असोशिएशन
- शीप मॅगेझिन , सर्व लेख 'online' मोफत वाचता येतात.
- "मेंढी ते घोंगडी - एक खडतर प्रवास". 2015-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-03-06 रोजी पाहिले.