हळवा (पशुरोग)
हळवा (इंग्रजी-बॉट्युलिझम) हा जनावरांना जिवाणूंच्या बाधेमुळे होणारा एक रोग आहे.तो रोग बाधित खाद्य व पाण्याचे सेवनामुळे जनावरांत उद्भवतो.
इतर नावे
संपादनलागण
संपादनसडलेला चारा,डबक्यातील साचलेले घाण पाणी अथवा दोषयुक्त खाद्य जनावरांना खाण्यास दिल्यामुले याची लागण होते.
लक्षणे
संपादनया रोगात जनावराचा कंबरेपासूनचा मागचा भाग व पाय लुळा पडतो.जनावराचा शेपटीवरचा ताबा सुटतो.टांचणी अथवा सुईने अशा भागावर टोचले असता, तो भाग निर्जीव झाल्यागत, जनावर काहीही प्रतिक्रिया देत नाही.जनावरास ताप रहात नाही उलट, त्याचे शरीर थंड पडते.
औषधोपचार
संपादनप्राण्यास विषबाधा झाली काय ते पशुवैद्यक डोक्टरांचे सल्ल्याने तपासावे व योग्य ते औषधोपचार करावेत.
प्रतिबंधक उपाय
संपादनजनावरास नेहमी स्वच्छ व ताजे पाणी पाजावे.सडके घाणेरडे पदार्थ, खाद्य,पालापाचोळा इत्यादी गुरांना खाण्यास देऊ नये. एखाद्या खाद्यपदार्थाच्या शुद्धतेबद्दल शंका असल्यास, ते खाद्य देणे टाळावे.विनाकारण चाचणी करू नये.
हेही बघा
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |