प्राणनाथ थापर
जनरल प्राणनाथ थापर (पंजाबी: ਪ੍ਰਾਨ ਨਾਥ ਥਾਪਰ ;) (मे २३, इ.स. १९०६ - जून २३, इ.स. १९७५) हे भारतीय सेनेच्या भूदलाचे पाचवे प्रमुख होते. त्यांनी मे ७, इ.स. १९६१ रोजी भूदलप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली व ती नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत सांभाळली.
सैनिकी कारकीर्दसंपादन करा
महाविद्यालयीन शिक्षणानंतर थापरांनी बर्कशायर, युनायटेड किंग्डम येथील रॉयल अकॅडमी ऑफ सॅंडहर्स्ट या सैनिकी अकादमीत प्रशिक्षण घेतले. इ.स. १९२६ साली १ल्या पंजाब रेजिमेंटीमध्ये ते दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटिश भारतीय सैन्यातर्फे बर्मा, मध्यपूर्व व इटली आघाड्यांवरील मोहिमांत सहभागी झाले होते. त्यांना नोव्हेंबर, इ.स. १९४७मध्ये मेजर जनरलपदावर बढती मिळाली, तर इ.स. १९५४ साली त्यांची लेफ्टनंट जनरलपदी नेमणूक झाली होती.
सेवानिवृत्तीनंतरचे जीवनसंपादन करा
भूदलातून सेवानिवृत्त झाल्यावर थापर ऑगस्ट, इ.स. १९६४ ते जानेवारी, इ.स. १९६९ या काळात अफगाणिस्तानात भारताचे राजदूत होते. २३ जून, इ.स. १९७५ रोजी नव्या दिल्लीत वयाच्या ६९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.