प्रकाश विश्वनाथ परांजपे

भारतीय राजकारणी
(प्रकाश परांजपे या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रकाश विश्वनाथ परांजपे (२८ जुलै १९४७ - २० फेब्रुवारी २००८) हे शिवसेना पक्षाकडून १९९६ ते मृत्यूपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. परांजपे यांचा जन्म पनवेल, महाराष्ट्र येथे २८ जुलै १९४७ रोजी झाला. संसदेत निवडून येण्यापूर्वी त्यांनी ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक पदे भूषवली. १५ मे १९७२ रोजी त्यांनी सुप्रिया प्रकाश परांजपे यांच्याशी विवाह केला. कर्करोगाशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी परांजपे यांचे २० फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.[१]

प्रकाश विश्वनाथ परांजपे

कार्यकाळ
१९९६ – २० फेब्रुवारी २००८
मागील राम कापसे
पुढील आनंद परांजपे
मतदारसंघ ठाणे

जन्म २८ जुलै १९४७ (1947-07-28)
पनवेल, महाराष्ट्र
मृत्यू २० फेब्रुवारी, २००८ (वय ६०)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी सुप्रिया प्रकाश परांजपे
अपत्ये
निवास ठाणे
शिक्षण बी.कॉम.

मुंबई विद्यापीठ, मुंबई

धर्म हिंदु

पदे भूषवली संपादन

  • १९७४-८०ः नगरसेवक, नगरपरिषद, ठाणे
  • १९८६-९७ः नगरसेवक, महानगरपालिका, ठाणे
  • १९९०ः महापौर, महानगरपालिका, ठाणे[ संदर्भ हवा ]
  • १९९२ः विरोधी पक्षनेते, महानगरपालिका, ठाणे
  • १९९६ः ११व्या लोकसभेत ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले
  • १९९६-९७ः सदस्य वाणिज्य समिती, सदस्य सभा पटलावर ठेवलेल्या कागदपत्रांसंबंधी समिती, सदस्य सल्लागार समिती भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय
  • १९९८ः १२व्या लोकसभेत ठाणे लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले
  • १९९८-९९ः सदस्य नियम समिती, सदस्य विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण आणि वन समिती आणि गंगा कृती आराखड्यावरील उपसमिती, सदस्य सल्लागार समिती पर्यावरण आणि वन मंत्रालय

हे देखील पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

http://loksabhaph.nic.in/Members/memberbioprofile.aspx?mpsno=२९०&lastls=१४

संदर्भ संपादन

  1. ^ http://loksabhaph.nic.in/Members/memberbioprofile.aspx?mpsno=290&lastls=14