पौर्णिमा
चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तांमध्ये १८० अंशाचा फरक असतो.[१] पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौणिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते. प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल (शुद्ध) पक्षाचा तो शेवटचा दिवस असतो.
इंग्रजीत पौर्णिमेला Full Moon म्हणतात.
पौर्णिमेलाच मराठीत पुनव हा शब्द आहे, हिंदीत पूर्णिमा किंवा पूनम.
पौर्णिमांची पाश्चात्त्य नावे
संपादन- जानेवारी - Wolf Moon, Moon After Yule, Old Moon, Ice Moon, and Snow Moon..
- फेब्रुवारी - Snow Moon, Hunger Moon, Storm Moon and Chaste Moon.
- मार्च - Worm Moon, Crow Moon, Crust Moon, Sap Moon, Sugar Moon, and Chaste Moon and Lenten Moon..
- एप्रिल - Pink Moon, Sprouting Grass Moon, Fish Moon, Hare Moon, Egg Moon and Paschal Moon.
- मे - Flower Moon, Corn Planting Moon, and Milk Moon
- जून - Strawberry Moon, Hot Moon, Mead Moon, and Rose Moon..
- जुलै - Buck Moon.
- ऑगस्ट - Sturgeon Moon, Green Corn Moon, Barley Moon, Fruit Moon, and Grain Moon.
- सप्टेंबर - Corn Moon, Full Corn Moon or Barley Moon.
- ऑक्टोबर - Hunter's Moon, Dying Grass Moon, Blood Moon or Sanguine Moon.
- नोव्हेंबर - Beaver Moon, Oak Moon, Frosty Moon
- डिसेंबर - Cold Moon, Oak Moon.
दर १९ वर्षांनंतर येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमा येत नाही, त्या न येणाऱ्या पौर्णिमेला Black Moon म्हणतात.
ज्या कॅलेंडर वर्षात १३ पौर्णिमा असतात, त्यातल्या दुसऱ्या पौर्णिमेला Blue Moon म्हणतात.
हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा
संपादन- चैत्रात चैत्रपौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती असते. त्याच दिवशी तिथीने शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते.
- वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
- ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात. त्यादिवशी कबीर जयंती असते.
- आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा असते.
- श्रावण पौर्णिमीला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणतात.
- भाद्रपद पौर्णिमाला प्रौष्ठपदी पौर्णिमा म्हणतात.
- आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते.
- कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी उत्तर भारतात देव दीपावली असते. गुरुनानक जयंती.
- मार्गशीर्षात मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्त जयंती), पौषात शाकंभरी, माघ महिन्यात माघी पौर्णिमा, आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.
- मार्गशीर्ष पौर्णिमेचे आणखी एक नाव - बत्तिसी पौर्णिमा.
- माघ पौर्णिमा - गुरू रविदास जयंती, संत रोहिदास जयंती
- अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला कोणताही सण नसतो.
बौद्ध पौर्णिमा
संपादन- अश्विनी पौर्णिमा (महाप्रवारणा पौर्णिमा)
- आषाढ पौर्णिमा (गुरू पौर्णिमा) जगाचे आद्य गुरू भगवान गौतम बुद्ध यांनी पंचवर्गीय भिक्षूंना धम्माची शिकवण दिली त्यामुळे आषाढ पौर्णिमेला गुरू पौणिमा म्हणतात.
- कार्तिक पौर्णिमा
- चैत्र पौर्णिमा
- ज्येष्ठ पौर्णिमा
- फाल्गुन पौर्णिमा
- वैशाख पौर्णिमा
- भाद्रपद पौर्णिमा
- माघ पौर्णिमा
- मार्गशीर्ष पौर्णिमा
- श्रावणी पौर्णिमा
चंद्रग्रहणे
संपादनवर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते. जर चंद्रावर पडलेली पृथ्वीची छाया ही उपछाया असेल तर होणाऱ्या ग्रहणाला छायाकल्प ग्रहण म्हणतात. हे ग्रहण डोळ्यांना जाणवत नाही.
इसवी सन १९०१, १९०५; १९०८,१९१२; १९१९, १९२३, १९२६, १९३०; १९३७, १९४१; १९४८, १९५२; १९५५, १९५९; १९६६, १९७०; १९७३, १९७७; १९८४, १९८८; १९९५, १९९९ ह्या विसाव्या शतकातील २२ वर्षी चंद्रग्रहणे नव्हती. यावरून असा निष्कर्ष निघतो की चंद्रग्रहण नसण्याचे खंड म्हणजे इसवी सनाचे तीन-चार वर्षांचे कालांतर असते. मात्र, दर चतुर्वर्षीय कालांतरानंतर तीन किंवा सात (क्वचित १०) वर्षांचा खंड पडतो.
याच नियमाने २१व्या शतकात २००२ ते २००६; २०१६ ते २०; २०२७ ते ३१ .......या कालखंडांत चंद्रग्रहणे नसतील.
२०व्या शतकापासून ते ३०व्या शतकापर्यंतच्या काळात १२,०६४ चंद्रग्रहणे होती/असतील
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |