अमावास्या' ते 'पौर्णिमा' या काळामध्ये पृथ्वीवरून आपणास दररोज चंद्राचा अधिकाधिक भाग प्रकाशित होताना दिसतो. त्या आकारमानाने वाढत जाणाऱ्या आणि त्यानंतर पुढील १५ दिवसांत लहानलहान होत जाणाऱ्या चंद्रकोरींना चंद्राच्या कला म्हणतात.