पेत्रा क्वितोव्हा

(पेत्रा क्वितोवा या पानावरून पुनर्निर्देशित)


पेत्रा क्वितोव्हा (चेक: Petra Kvitová; जन्मः ८ मार्च १९९०, बिलोव्हेच, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००६ साली व्यावसायिक बनलेली क्वितोव्हा २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून प्रसिद्धीझोतात आली. तिने विंबल्डन स्पर्धा दुसऱ्यांदा २०१४ साली जिंकली. सध्या क्वितोव्हा डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

पेत्रा क्वितोव्हा
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य मोनॅको
जन्म ८ मार्च, १९९० (1990-03-08) (वय: ३४)
बिलोवेच, चेकोस्लोव्हाकिया
सुरुवात २००६
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१,२५,९०,१०१
एकेरी
प्रदर्शन 633–288
अजिंक्यपदे १२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (ऑक्टोबर २०११)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२०१२)
फ्रेंच ओपन उपांत्य फेरी (२०१२)
विंबल्डन विजयी (२०११, २०१४)
यू.एस. ओपन चौथी फेरी (२००९, २०१२)
दुहेरी
प्रदर्शन 13–35
शेवटचा बदल: जुलै २०१४.

डाव्या हाताने खेळणारी क्वितोव्हा आपल्या वेगवान सर्व्हिससाठी ओळखली जाते.

कारकीर्द

संपादन

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेती २०११ विंबल्डन गवताळ   मारिया शारापोव्हा 6–3, 6–4
विजेती २०१४ विंबल्डन गवताळ   युजिनी बुशार 6–3, 6–0

बाह्य दुवे

संपादन