पॅन अमेरिकन महामार्ग
पॅन-अमेरिकन महामार्ग ( पोर्तुगीज: Rodovia/Autoestrada Pan-americana ; स्पॅनिश: Autopista/Carretera/Ruta Panamericana) हे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत पसरलेले सुमारे ३०,००० किलोमीटर (१९,००० मैल) लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. [१] हा महामार्ग अमेरिका खंडांच्या उत्तर टोकाला दक्षिणेशी जोडतो. यात अंदाजे १०६ किमी (६६ मैल)चा खंड पडलेला आहे. वायव्य कोलंबिया आणि आग्नेय पनामा यांच्या मधील डेरिएन गॅप भागात अद्यापही रस्ता नाही. प्रचंड गर्द झाडी व वर्षभर होत असलेला तुफान पाउस यांमुळे हा भाग अजूनही अविकसित आहे. पॅन अमेरिकन महामार्ग अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील जवळजवळ सर्व देशांना जोडतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, पॅन-अमेरिकन महामार्ग हा "मोटारीने प्रवासकरण्याजोगा जगातील सर्वात लांब रस्ता" आहे.
पॅन-अमेरिकन महामार्ग अनेक प्रकारच्या हवामानआणि पर्यावरणीय प्रदेशांतून जातो — यात घनदाट जंगलांपासून ते रखरखीत वाळवंट आणि ओसाड टुंड्रापर्यंत सगळे प्रकार आहेत. या महामार्गाचा काही भाग केवळ कोरड्या हंगामात पार करता येतो आणि बऱ्याच प्रदेशांमध्ये वाहन चालवणे काही मोसमात धोकादायक असते. पॅन-अमेरिकन महामार्ग उत्तर अमेरिकेतील प्रुडहो बे, अलास्का पासून दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकांजवळील चिलीमधील पोर्तो मॉन्ट आणि क्वेलोन आणि अर्जेंटिनामधील उशुआया शहरांना जोडतो.
डॅरिएन गॅपच्या पश्चिम आणि उत्तरेला, हा रस्ता मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमधून आंतर-अमेरिकन महामार्ग म्हणूनही ओळखला जातो. तेथे हा महामार्ग मेक्सिको-युनायटेड स्टेट्स सीमेकडे जाणाऱ्या अनेक जोडरस्त्यांमध्ये विभाजित होतो.
जोडलेले देश
संपादनपॅन-अमेरिकन महामार्ग उत्तर आणि मध्य अमेरिकेतील नऊ देशांमधून जातो:
हा महामार्ग दक्षिणअमेरिकेच्या पाच देशांमधून प्रवास करतो:
यांशिवाय जोडरस्ते चार इतर दक्षिण अमेरिकन देशांना जोडतात:
डॅरिएन फट
संपादनपॅन-अमेरिकन महामार्गात पनामा आणि कोलंबिया दरम्यान १०६ किमी (६६ मैल)चा खंड आहे. घनदाट जंगल, बारा महिने होणारा तुफान पाउस आणि दलदलींचा हा प्रदेश डॅरिएन गॅप म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश चार दिवसांच्या खडतर पायी प्रवासानेच ओलांडता येतो. महामार्ग टर्बो, कोलंबिया आणि याविझा, पनामा येथे संपतो. येथे रस्ता बांधण्याचे अनेक प्रयत्न झाले परंतु ते सोडून दिले गेले. २०२३ च्या सुमारास असा कोणताही बेत नाही.
चित्रदालन
संपादन-
डेडहोर्स, अलास्का, येथील पॅन-अमेरिकन महामार्गाचे उत्तरेकडील टोकाजवळ
-
सान मार्तिन, एल साल्वादोर मधील पॅन-अमेरिकन महामार्ग
-
एल साल्वादोरमधील पॅन-अमेरिकन महामार्गाचे आणखी एक दृश्य
-
लूर्देस आणि सांता आनामधील पॅन-अमेरिकन महामार्ग; हा सपाट १.५ किमीचा लांब रस्ता एल साल्वादोर यादवी युद्धादरम्यान विमाने उतरवण्यासाठी वापरला गेला होता
-
ग्वानाकास्ते, कॉस्ता रिका मधील पॅन-अमेरिकन महामार्ग
-
त्रेस रिओस, कॉस्ता रिकामधील पॅन-अमेरिकन महामार्गावरील टोलनाका. येथून पनामा अजून ३३७ किमी अंतरावर आहे
-
कॉस्ता रिका आणि पनामाची सीमा
-
इक्वेडोरमधील पॅन-अमेरिकन महामार्ग
-
पास्कामेयो, पेरू येथील पॅन-अमेरिकन महामार्ग
-
पिस्को, पेरू जवळ पॅन-अमेरिकन महामार्ग
-
पोर्तो दे लोमासजवळ पॅन-अमेरिकन महामार्ग
-
उत्तर चिलेच्या अटाकामा वाळवंटातून जाणारा पॅन-अमेरिकन महामार्ग
-
कॉर्दिलेरा दे अँडीस, दक्षिण इक्वेडोर
-
आर्जेंटिनाच्या बुएनोस आइरेस शहरातील पॅन-अमेरिकन महामार्ग
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "A Gap in the Andes: Image of the Day". earthobservatory.nasa.gov (इंग्रजी भाषेत). 2015-04-02. 2017-01-22 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- Rutkow, Eric (2019). The Longest Line on the Map: The United States, the Pan-American Highway, and the Quest to Link the Americas. Scribner. ISBN 9781501103926.