प्रुडहो बे (अलास्का)

(प्रुडहो बे या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रुडहो बे अलास्का राज्यातील नॉर्थ स्लोप बरो मधील छोटे गाव वजा शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या २,१७४ इतकी होती. २००० सालापासून यात ५ लोकांची वाढ झाली. यांशिवाय सुमारे १,००० हंगामी कामगार येथे वर्षभर असतात. येथून जवळचा विमानतळ आणि दुकान जवळच्या डेडहॉर्स शहरात आहेत.

जुलै २०१८ मधील प्रुडहो बे चे विहंगम दृश्य
प्रुडहो बे जवळील खाडीत एचएमस टायरलेस ही पाणबुडी

प्रुडहो बे हे पॅन-अमेरिकन महामार्गाचे उत्तरेकडील टोक आहे.

या गावाला ब्रिटिश भटक्या सर जॉन फ्रँकलिन यांनी १८२६मध्ये त्यांचे वर्गमित्र कॅप्टन अल्गरनॉन पर्सी, बॅरन प्रुडहोचे नाव दिले. फ्रँकलिनने कॅनडातील मॅकेन्झी नदीच्या मुखापासून जवळजवळ पॉइंट बॅरोपर्यंत किनारपट्टीच्या पश्चिमेला प्रवास केला. []

प्रुडहो बे साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
[ संदर्भ हवा ]

संदर्भ

संपादन
  1. ^ Sullivan, Walter. "Our Last Great Wilderness". American Heritage. American Heritage. 21 February 2019 रोजी पाहिले.