पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Pune International Film Festival किंवा पिफ) हा भारताच्या पुणे शहरामध्ये आयोजित केला जात असलेला एक वार्षिक चित्रपट महोत्सव आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानल्या जात असलेल्या पुणे शहरामध्ये हा महोत्सव २००२ सालापासून दरवर्षी भरवण्यात येतो.[] भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुण्यामध्येच स्थित असल्यामुळे हा चित्रपट महोत्सव पुण्यामध्ये भरवणे सयुक्तिक ठरते. महाराष्ट्र शासनातर्फे पुणे चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक तसेच मराठी चित्रपटांना अनेक पुरस्कार बहाल केले जातात.[]

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
महोत्सवाचे भित्तीपत्रक
स्थान पुणे
स्थापना २००२
पुरस्कार प्रभात, संत तुकाराम
दिग्दर्शक जब्बार पटेल
दिनांक २९ नोव्हेंबर २००२
भाषा मराठी
संकेतस्थळ https://www.piffindia.com/
गजेंद्र अहिरेचे चित्रपट शेवरी (२००७) आणि पिंपळ (२०१८) सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट ठरले आहेत.

पहिला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इ.स. २००२ मध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला गेला. सध्या डॉ. जब्बार पटेल महोत्सवाचे संचालक आहेत.[] ह्या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यांच्या हस्ते झाले. २०१०पासून महाराष्ट्र शासनाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आपला अधिकृत चित्रपट महोत्सव म्हणून मान्यता दिली.[] आंतरराष्ट्रीय ज्यूरी समितीकडून मराठी चित्रपटांची महाराष्ट्र शासनातर्फे पारितोषिकासाठी निवड होत असल्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक नव्या दमाच्या चित्रपट दिग्दर्शकांना आणि त्यांच्या चित्रपटांना महोत्सवात पारितोषिके मिळालेली आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवचा उद्देश चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कामाचे विविध प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे आहे, ज्यामुळे सांस्कृतिक आदानप्रदान आणि जागतिक चित्रपटांचा आदर वाढवणे आहे.

श्रेणी आणि स्पर्धा

- जागतिक स्पर्धा: आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटांचे प्रदर्शन.

- मराठी स्पर्धा: मराठी भाषेतील चित्रपटांवर लक्ष केंद्रित.

- विद्यार्थी स्पर्धा: विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन.

- शॉर्ट फिल्म स्पर्धा: जगभरातील शॉर्ट फिल्म्सचा समावेश.

विभाग

- रेट्रोस्पेक्टिव्ह: नामांकित चित्रपट निर्मात्यांच्या कामांचे प्रदर्शन.

- देश विशेष: विशिष्ट देशातील चित्रपटांचे प्रदर्शन.

- श्रद्धांजली: चित्रपट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान.

- विशेष स्क्रीनिंग: विशेष रस असलेले चित्रपट, बहुधा वर्तमान घटनांशी संबंधित किंवा सांस्कृतिक विषयांवर आधारित.

कार्यक्रम आणि उपक्रम

- कार्यशाळा: चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंवर उद्योगातील व्यावसायिकांनी घेतलेल्या कार्यशाळा.

- पॅनेल चर्चा: चित्रपट निर्माते, समीक्षक, आणि तज्ज्ञांनी विविध चित्रपट संबंधित विषयांवर चर्चा.

- नेटवर्किंग संधी: चित्रपट निर्माते, निर्माते आणि इतर उद्योगातील व्यावसायिकांना जोडण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी कार्यक्रम आणि संमेलन.

वैशिष्ट्ये

पीआयएफएफने अनेक उल्लेखनीय चित्रपट आणि व्यक्तींचे स्वागत केले आहे, ज्यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक परिदृश्याला मोठे योगदान मिळाले आहे आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा प्रचार केला आहे.

मराठी चित्रपट स्पर्धा पुरस्कार

संपादन

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनातर्फे जागतिक तसेच मराठी चित्रपटांना रोख पुरस्कार दिले जातात.[]

  • महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार - पिंपळ
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - गजेंद्र अहिरे
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट अभिनेता पुरस्कार - रमण देवकर ('म्होरक्या'साठी)
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट अभिनेत्री पुरस्कार - मिताली जगताप ('नशीबवान'साठी)
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी पटकथा पुरस्कार - गजेंद्र अहिरे ('पिंपळ'साठी)
  • महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार - लेथ जोशी.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - संदीप भालचंद्र पाटील
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट अभिनेता पुरस्कार - आर्य आढाव ('दशक्रिया'साठी)
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट अभिनेत्री पुरस्कार - तनिष्ठा चटर्जी ('डॉ. रखमाबाई'साठी)
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी पटकथा पुरस्कार - राजेश मापुसकर ('व्हेंटिलेटर'साठी)
  • महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार - रंगा पतंगा.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - प्रसाद नामजोशी ('रंगा पतंगा'साठी)
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट अभिनेता पुरस्कार - किशोर कदम ('परतु'साठी)
  • महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार - एलिझाबेथ एकादशी.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - भाऊराव कऱ्हाडे ('ख्वाडा'साठी)
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट अभिनेता पुरस्कार - उषा नाईक ('एक हजाराची नोट'साठी)
  • महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार - फॅंड्री.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - नागराज मंजुळे ('फॅंड्री'साठी)
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट अभिनेता पुरस्कार - सोमनाथ अवघडे ('फॅंड्री'साठी)
  • महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार - काकस्पर्श.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - गजेंद्र अहिरे ('अनुमती'साठी)
  • महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार - काकस्पर्श.
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - उमेश विनायक कुलकर्णी ('देऊळ'साठी)

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b महोत्सवाचा इतिहास
  2. ^ "Pune International Film Festival". www.piffindia.com. 2024-06-02 रोजी पाहिले.
  3. ^ संचालकांचे मनोगत (इंग्रजीत)[१]
  4. ^ महाराष्ट्र शासनाचे रोख पुरस्कार (इंग्रजीत) [२]