सोमनाथ अवघडे
सोमनाथ अवघडे मराठी चित्रपट अभिनेता आहे. याने फँड्री या चित्रपटात काम केले आहे.[१] फॅन्ड्री चित्रपटातील 'जब्या' या भूमिकेसाठी त्यांला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[२]
सोमनाथ अवघडे | |
---|---|
अवघडे (उजवीकडे) 61व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, नवी दिल्ली | |
जन्म |
सोमनाथ लक्ष्मण अवघडे केम, करमाळा तालुका, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
कारकीर्दीचा काळ | 2013-वर्तमान |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | फँड्री (2013) |
वडील | लक्ष्मण अवघडे |
आई | जयश्री अवघडे |
प्रारंभिक जीवन आणि कुटुंब
संपादनसोमनाथ अवघडे हा केम, करमाळा तालुका, सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्याच्या कुटुंबात आई वडील मोठा भाऊ रवी आणि बहीण अंबिका आहेत. सोमनाथचे वडील लक्ष्मण अवघडे यांचा व्यवसाय पोतराज व ते हलगीही वाजवतात आणि आई शेतात मोलमजुरी करते.
कारकीर्द
संपादनअवघडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात फॅन्ड्री या चित्रपटातून केली आणि या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तो प्रसिद्ध झाला.[३] दिग्दर्शक नागराज मंजुळे हे करमाळ्यातील जेऊर गावचे आहेत. 2011 मध्ये 'पिस्तुल्या' या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानिमित्त केम गावात मंजुळे यांचा सत्कार होणार होता. जेव्हा ते कार्यक्रमाला आले तेव्हा त्यांनी सोमनाथला हलगी वाजवताना पाहिले आणि तिथेच सोमनाथची फॅन्ड्री चित्रपटाचा नायक म्हणून निवड झाली.[४]
पुढे त्याने फ्रि हिट दणका आणि अमिताभ बच्चन स्टारर झुंड या चित्रपटात अवघडे यांनी मुख्य भूमिका केल्या. 2023 मध्ये मंजुळे यांनी अवघडेला घर बंदुक बिरयानी कास्ट केले.
चित्रपट
संपादन- फॅन्ड्री
- फ्रि हिट दणका
- झुंड
- घर बंदूक बिरयानी
- संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील
पुरस्कार
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "संग्रहित प्रत". 2016-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-22 रोजी पाहिले.
- ^ "बाबो! इतका बदललाफँड्रीतला जब्या; त्याचा नवीन लुक पाहिलात का?". Maharashtra Times. 2023-03-29 रोजी पाहिले.
- ^ "National Film Awards: Rajkummar Rao wins Best Actor for 'Shahid'". DNA India (इंग्रजी भाषेत). 2023-03-29 रोजी पाहिले.
- ^ "फँड्रीतील जब्या - सोमनाथ अवघडे | थिंक महाराष्ट्र". web.archive.org. 2016-12-25. रोजी मूळ पानापासून संग्रहित2016-12-25. 2023-03-29 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Reality Check". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2014-05-05. 2023-03-29 रोजी पाहिले.
- ^ "Fandry sweeps five awards at PIFF". ISSN 0971-8257.
- ^ "Winners of the Ajeenkya DY Patil Filmfare Awards (Marathi)". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 2023-03-29 रोजी पाहिले.
- ^ "Fandry - Fandry यांनी त्यांचे कव्हर चित्र बदलले". www.facebook.com. 2023-03-29 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सोमनाथ अवघडे चे पान (इंग्लिश मजकूर)