उमेश विनायक कुलकर्णी
हा लेख उमेश विनायक कुलकर्णी नामक मराठी चित्रपटदिग्दर्शक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, उमेश कुलकर्णी (निःसंदिग्धीकरण).
उमेश विनायक कुलकर्णी (डिसेंबर ६, १९७६ - हयात) हा मराठी चित्रपट दिग्दर्शक आहे.
उमेश विनायक कुलकर्णी | |
---|---|
| |
जन्म |
उमेश विनायक कुलकर्णी डिसेंबर ६, १९७६ भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट दिग्दर्शन |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | वळू |
कारकीर्दसंपादन करा
उमेश विनायक कुलकर्णी ह्यांचा जन्म ६ डिसेम्बर १९७६ ला पुणे (महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी पुणे येथील ब्रिहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. २००० ला त्यांनी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था पुणे (एफ टी आय आय ) येथे दिग्दर्शन पदवीसाठी प्रवेश घेतला. सुरवाती पासूनच चित्रपटाची आवड असणाऱ्या उमेश कुलकर्णी ह्यांनी आपल्या अभ्यासा निमित्ताने बरेच लघु चित्रपट तयार केले जे बर्याच अंतरराष्ट्रीय महोत्सवास कौतुकास पात्र ठरले.
चित्रपटसंपादन करा
वर्ष (इ.स.) | चित्रपट | भाषा | सहभाग |
---|---|---|---|
२००८ | वळू | मराठी | दिग्दर्शन |
१९९५ | दोघी | मराठी | दिग्दर्शन सहाय्य |
२०१० | विहीर | मराठी | दिग्दर्शन |
२०११ | देऊळ | मराठी | दिग्दर्शन |
२०१५ | हायवे एक सेल्फी आरपार | मराठी | दिग्दर्शन |
पुरस्कारसंपादन करा
२०१२ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसंपादन करा
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - देऊळ
५९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसंपादन करा
- सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार - देऊळ