गजेंद्र विठ्ठल अहिरे (१६ फेब्रुवारी, इ.स. १९६९[१] - हयात) हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आणि कवी आहेत. मराठी अभिनेत्री वृंदा गजेंद्र त्यांच्या पत्‍नी आहेत.

Gajendra Ahire.jpg

जीवनसंपादन करा

गजेंद्र अहिरे यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. रुईया महाविद्यालयात असताना त्यांनी लिहिलेल्या व संजय नार्वेकर याने दिग्दर्शिलेल्या कथा ओल्या मातीची नावाच्या नाटकात अभिनय करणाऱ्या व त्या वेळेस इयत्ता अकरावीत असलेल्या वृंदा पेडणेकर हिच्याशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून पुढे २५ नोव्हेंबर, इ.स. १९९५ रोजी त्यांचे लग्न झाले.

कारकीर्दसंपादन करा

गजेंद्र अहिरे यांनी ३५हून अधिक चित्रपट काढले. विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट त्यांनी २००२मध्ये काढला. हा त्यांचा ३रा चित्रपट होता.

चित्रपटसंपादन करा

चित्रपटाचे नाव वर्ष भाषा सहभाग
अनवट इ.स. २०१४ मराठी कथा, दिग्दर्शन
अनुमती इ.स. २०१३ मराठी कथा, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन
वासुदेव बळवंत फडके इ.स. २००७ मराठी संवाद, दिग्दर्शन
गुलमोहर इ.स.२००९ मराठी दिग्दर्शन
टूरिंग टॉकीज इ.स. २०१३ मराठी दिग्दर्शन
दिवसेन्‌ दिवस इ.स.२००६ मराठी कथा, पटकथा, दिग्दर्शन
नॉट ओन्ली मिसेस राऊत इ.स. २००३ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, संपादन
नातीगोती इ.स. २००६ मराठी संपादन, दिग्दर्शन
निळकंठ मास्तर इ.स. २०१५ मराठी कथा, दिग्दर्शन
पारध इ.स.२०१० मराठी दिग्दर्शन
पिपाणी इ.स. २०१२ मराठी दिग्दर्शन
पोस्ट कार्ड इ.स. २०१४ मराठी पटकथा, दिग्दर्शन
बायो इ.स. २००६ मराठी कथा, दिग्दर्शन
मायबाप इ.स. २००७ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
विठ्ठल विठ्ठल इ.स. २००३ मराठी निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
शासन शासन इ.स. २०१६ मराठी कथा, दिग्दर्शन
शेवरी इ.स.२००६ मराठी कथा, दिग्दर्शन
समुद्र इ.स.२०१० मराठी कथा, दिग्दर्शन
सरीवर सरी इ.स. २००५ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
दि सायलेन्स इ.स. २०१५ मराठी दिग्दर्शन
सुंबरान इ.स.२००९ मराठी कथा, दिग्दर्शन
सैल इ.स.२००६ मराठी कथा, दिग्दर्शन
स्वामी पब्लिक लि. इ.स. २०१४ मराठी दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद
हॅलो जयहिंद इ.स. २०११ मराठी दिग्दर्शन

गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली चित्रपट गीतेसंपादन करा

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. ^ ठाकूर,दिलीप. "श्रीमान श्रीमती - गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे".

बाह्य दुवेसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.