पळशी झाशी

भारतातील गाव

'पळशी झाशी' हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेलं गाव आहे. येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो .शेती हा या गावातील प्रमुख व्यवसाय आहे .जवळजवळ ८०-९० टक्के लोक शेतीवरच जीवन जगतात . वरवट आणि खामगाव हे ठिकाण येथील शेतकऱ्यांसाठी उत्तम म्हणजे जवळ असलेला कृषी बाजार आहे. या गावात १ एप्रिल २०१४ पासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे, तसेच येथे अंगणवाडी आहे. या गावामध्ये दोन शाळांचा समावेश आहे ,त्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही ७ वी पर्यंत आणि शंकरगिरी महाराज विद्यालय हे १० वी पर्यंत आहे. हे गाव 'शंकरगिरी महाराज' मंदिरासाठी आणि तेथील महाशिवारात्री निमित्त होणाऱ्या ६ ते ७ क्विंटलच्या रोडगा या महाप्रसादासाच्या आश्चर्यासाठी खुप प्रसिद्ध आहे.येथे निरनिराळ्या जातीचे व धर्माचे लोक एकपरिवारासम राहतात. तसेच काही इतर उत्सव साजरे केले जातात , त्यामध्ये शिव जयंती ‍‍, जिजाऊ जयंती ;डॅा. आंबेडकर जयंती; महात्मा फुले जयंती आणि सांस्कृतिक सण जसे दिवाळी , दसरा, होळी, पोळा, इत्यादी उत्सव आनंदाने साजरे केले जातात. युवक मित्रांकडुन या गावात २३ मार्च २०१३ पासून "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, पळशी झाशी" हे ग्रंथालय सुरू करण्यात आले.

  ?पळशी झाशी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
शंकरगिरी महाराजांचे छायाचित्र
शंकरगिरी महाराजांचे छायाचित्र
शंकरगिरी महाराजांचे छायाचित्र
Map

२१° ०३′ ३०.७८″ N, ७६° ४०′ २१.८१″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर जळगाव ‍‍‍(जामोद)
जिल्हा बुलढाणा
तालुका/के संग्रामपूर
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
३,१४१ (२००१)
९२८ /
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४४२०२
• +०७२६६
• MH-28