पठाणकोट (पंजाबी: ਲੁਧਿਆਣਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक शहर व पठाणकोट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पठाणकोट शहर पंजाबच्या उत्तर भागात पंजाब, जम्मू आणि काश्मीरहिमाचल प्रदेश ह्या तीन राज्यांच्या सीमेजवळ चक्की नदीच्या काठावर हिमालयाच्या पायथ्याशी वसले आहे. जम्मू आणि काश्मीरचे प्रवेशद्वार मानले जाणारे पठाणकोट पंजाबम्धील ९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हिमाचल प्रदेशातील डलहौसी, चंबा, धरमशाला इत्यादी लोकप्रिय पर्यटनस्थळांपर्यंत पोचण्यासाठी पठाणकोटमधूनच जावे लागते. भारतीय लष्कराचा मामुन हा एक मोठा व महत्त्वाचा तळ पठाणकोट येथे आहे.

पठाणकोट
ਪਠਾਣਕੋਟ
भारतामधील शहर

Pathankot City 2.jpg

पठाणकोट is located in पंजाब
पठाणकोट
पठाणकोट
पठाणकोटचे पंजाबमधील स्थान

गुणक: 32°16′N 75°39′E / 32.267°N 75.650°E / 32.267; 75.650

देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
जिल्हा पठाणकोट जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १,०८६ फूट (३३१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,४८,९३७
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

जालंधर ते उरी दरम्यान धावणारा व जम्मू, श्रीनगर, बारामुल्ला इत्यादी शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग १ ए पठाणकोटमधून जातो. तसेच पठाणकोट रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे स्थानक असून जम्मू तावीकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या पठाणकोट छावणी स्थानकामध्ये थांबतात.