बौद्ध ध्वज किंवा पंचशील ध्वज हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे.[] जगभरातील बौद्ध अनुयायी या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात.

पंचशील बौद्ध ध्वज
बीजिंग (चीन) मध्ये फडकणारा बौद्ध ध्वज.

इतिहास

संपादन
 
नान तेन विहार, ओलोंगोंग, ऑस्ट्रेलियामध्ये फडकणारा बौद्ध ध्वज

ध्वज मूलतः रचना इ.स. १९८५ मध्ये कोलंबो समिती, कोलंबो, श्रीलंका येथे झाली[] व या समितीत पुढील सदस्य होते, पूज्य हिक्कादुवे सुमंगल थेरा (अध्यक्ष), पूज्य मीगेत्तूवेत्ते गुनानंद थेरा, डोनाल्ड डॉन कारोलीस हेवाविथारणा (Don Carolis Hewavitharana), अन्द्रीस बायर धम्मगुणवर्धना (Andiris Baer Dharmagunawardhana), चार्ल्स ए. डिसिल्व्हा, पीटर डी. अब्रेऊ, विल्यम डी अब्रेऊ, विल्यम एल. फर्नांडोचा, एन,एस. फर्नांडोचा आणि कार्लिस पुजीथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता.[]

बौद्ध ध्वज हा सर्वप्रथम २८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमा[] (बुद्ध जयंती) या सणाच्या ब्रिटिश साम्राज्याखालील सुट्टीचा दिवशी फडकवण्यात आला.कर्नल हेन्री स्टील ओल्कोट या अमेरिकन पत्रकारांनी त्यात थोडा बदल सुचवला.

इ.स. १८८९ मध्ये सुधारित ध्वज सुरू करण्यात आला व जपानचे अंगारिका धम्मपाल आणि कर्नल ओल्कोट यांनी तो म्यानमारच्या सम्राटाकडे सुपूर्द केला.

इ.स. १९५२ मध्ये जागतिक बौद्ध परिषदेने हा ध्वज आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून स्वीकारला.[] []

बौद्ध ध्वजातील पाच रंगांचे अर्थ

  1. निळा : प्रेमळवृत्ती व दयाळूपणा, शांती आणि वैश्विक करुणा.
  2. पिवळा : मध्यम मार्ग, टोकाची भूमिका त्याज्य, निश्चल शांतता.
  3. लाल : यशसिद्धी, शहाणपण, सदाचार, संपन्नता व प्रतिष्ठा.
  4. पांढरा : धम्म शुद्धता, सर्वत्र स्वातंत्र्यभिमुखताव निर्मलता.
  5. नारंगी : ज्ञान व शहाणपण.

आणि सहावी सर्व रंगांचे संमिलन करणारी पट्टी तेज संमिलन (aura's spectrum) दर्शवते. तसेच हे एकत्रीकरण म्हणजे प्रकाशाचा सार Pabbhassara (essence of light).

वैविध्य

संपादन
जपानी बौद्ध ध्वज, तोक्यो
धम्मचक्र ध्वज, थायलंडमधील बौद्ध धर्माचे प्रतीक
 
बौद्ध उत्सव आंबेडकर जयंतीमध्ये निळा बौद्ध ध्वज फडकवणारे भारतीय बौद्ध, चैत्यभूमी, मुंबई.

संप्रदायिक बौद्ध ध्वज कई वेगवेगळ्या बौद्ध विहारमध्ये फडकतात. तथापि, त्यांची स्वतःची काही विशिष्ठ शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे.

  • थायलंडचा एक बौद्ध ध्वज आहे, जो पूर्णपणे मूळ बौद्ध ध्वज आहे पण त्यात धम्मचक्र आहे.
  • म्यानमारमध्ये थेरवादी बौद्ध ध्वजात नारंगी रंगाच्या स्थानावर गुलाबी रंगाचा उपयोग केला गेला आहे.
  • थायलंडमध्ये थेरवाद बौद्ध लाल धम्मचक्र असणाऱ्या पिवळ्या बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, अनेकदा आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वजासोबत या ध्वजाची परेड केली जाते.
  • गोशिमिकामाकू जपानी ध्वजात नारंगी रंगाऐवजी गडद निळ्या रंगाचा उपयोग झाला आहे.
  • कोरीयन बौद्ध पांढरा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात ज्यात लाल रंगाचे स्वस्तिक आहे.
  • सोका गकाई तिरंगा बौद्ध ध्वजाचा उपयोग करतात, ज्यामध्ये निळा, पिवळा आणि लाल रंग आहे.[]

हे ही पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "The Origin and Meaning of the Buddhist Flag". The Buddhist Council of Queensland. 2 April 2015 रोजी पाहिले.
  2. ^ The Maha Bodhi, Volumes 98-99; Volumes 1891-1991. Maha Bodhi Society. 1892. p. 286.
  3. ^ name="bodhi"
  4. ^ http://buddhistcouncilofqueensland.org/node/143
  5. ^ name="dk"
  6. ^ Wilkinson, Phillip (2003). DK Eyewitness Books: Buddhism. p. 64. ISBN 9780756668303.
  7. ^ "Archived copy". 24 September 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-09-24 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)

बाह्य दुवे

संपादन