नितीन गडकरी
नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदार संघातून २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.[१]
नितीन गडकरी | |
---|---|
![]() | |
जन्म |
नितीन २७ मे,१९५७ नागपूर |
निवासस्थान | महाल, नागपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | पूलकरी |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | दादासाहेब धनवटे नगर विद्यालय, नागपूर , जी एस कॉमर्स कॉलेज, नागपूर |
पेशा | उद्योजक,राजकारण |
मूळ गाव | नागपूर |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पार्टी |
धर्म | हिंदू |
जोडीदार | सौ. कांचन गडकरी |
अपत्ये | ३, निखील, सारंग, कु.केतकी |
वडील | जयराम गडकरी |
आई | भानूताई गडकरी |
संकेतस्थळ http://www.nitingadkari.org/ |
ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. २६ मे २०१४ ला मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि. २९ मे २०१४ रोजी स्वीकारला.
यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.
इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.
भूषविलेली पदेसंपादन करा
- माजी मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, व पालकमंत्री, नागपूर,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र (कार्यकाळ: २७ मे १९९५ ते १९९९)[२]
- चेअरमन, पुर्ती ग्रुप[२]
- अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य[३]
- माजी विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद[२]
- माजी-सदस्य (आमदार),महाराष्ट्र विधान परिषद, (पदवीधर मतदार संघ) महाराष्ट्र. (वर्ष-१९८९, १९९०, १९९६ व बिनविरोध-२००२)[२]
- माजी सदस्य, हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन, महाराष्ट्र शासन.[२]
- माजी-अध्यक्ष, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ[२]
- अध्यक्ष, प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,[२]
- राज्य अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र.[४]
- राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी,[५]ष
इतर महत्त्वाची माहितीसंपादन करा
ते एक शेतकरीही आहेत.तसेच उद्योजकही आहेत.[२]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भसंपादन करा
- ^ तरुण भारत नागपूर, ई-पेपर, दि.१७/०५/२०१४,पान क्र. २, "'लोकसभा निवडणूक २०१४ महाराष्ट्रातील विजयी उमेदवार'" Check
|दुवा=
value (सहाय्य). २५ मे २०१४ रोजी पाहिले. - ↑ a b c d e f g h नागपूरपल्स.कॉम , "Nitin Gadkari |" Check
|दुवा=
value (सहाय्य). Nagpurpulse.com. 2012-07-11 रोजी पाहिले.(इंग्रजी मजकूर) - ^ भाजपाचे अधिकृत संकेतस्थळ[मृत दुवा](इंग्रजी मजकूर)
- ^ "बायोग्राफि ऑफ नितीन गडकरी". Silobreaker. 2012-07-11 रोजी पाहिले.(इंग्रजी मजकूर)
- ^ एकॉनॉमिक टाइम्स.कॉम "फिचर्स" Check
|दुवा=
value (सहाय्य). The Times Of India. 2009-12-20.(इंग्रजी मजकूर)