नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ - ८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नांदेड दक्षिण मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या १. लोहा तालुक्यातील सोनखेड महसूल मंडळ आणि २. नांदेड तालुक्यातील तुप्पा, विष्णूपुरी ही महसूल मंडळे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १० ते २७, ४० ते ४९, ५९ ते ६५ समावेश होतो. नांदेड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मोहनराव मारोतराव हंबर्डे हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | मोहनराव मारोतराव हंबर्डे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | हेमंत श्रीराम पाटील | शिवसेना | |
२००९ | ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
नांदेड दक्षिण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा | काँग्रेस | ७१,३६७ |
हेमंत श्रीराम पाटील | शिवसेना | ५३,९०४ |
ईश्वर लच्चीराम येमुल | बसपा | ९,३५४ |
बालाजी शेषराव शेळके | अपक्ष | १,०५८ |
विजय चंदराव हणमंते | अपक्ष | १,०२६ |
प्रभाकर दिगंबरराव जोशी पाटोदेकर | जद (धर्मनिरपेक्ष) | ५९४ |
विजयकुमार श्रीपटप्पा पाटील | अपक्ष | ३९६ |
बालाजी चंद्रकांत जोगदंड | अखिल भारतीय सेना | ३४३ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |