द्राविड भाषाकुळ हे जगभरातील अंदाजे २०० कोटी लोकांमार्फत वापरल्या जाणाऱ्या सुमारे ८५ विभिन्न भाषांचे भाषाकुळ आहे. या भाषाकुळातील भाषा प्रामुख्याने दक्षिण भारतात बोलल्या जातात. दक्षिण भारताशिवाय पूर्व व मध्य भारतात, तसेच भारताबाहेर ईशान्य श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, इराण व अन्य देशांमध्येही द्राविड भाषक विखुरले आहेत. द्राविड भाषाकुळांतर्गत तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम या भाषा लोकसंख्येच्या दृष्टीने प्रमुख गणल्या जातात.